केळीबाग रोड रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; ३३ दुकाने, घरांचा अडथळा दूर  महापालिकेला मिळणार मालमत्तांचा ताबा

राजेश प्रायकर 
Tuesday, 6 October 2020

दोन वर्षांपासून पुन्हा या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. राज्याच्या राजकारणाचे प्रमुख स्थान असलेल्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याचीही जागा संपादित करण्यात आली

नागपूर ः न्यायालयीन प्रक्रिया, भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे रखडलेल्या केळीबाग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला. उपविभागीय अधिकारी उद्या, बुधवारी या रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या ३३ मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात देणार आहे. यातील काही दुकानदारांनी यापूर्वीच दुकाने खाली केली किंवा मागे घेतली आहे. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

शहर विकास आराखड्यात रुंद असलेला केळीबाग रोड गेली अनेक वर्षे अरुंद आहे. महापालिकेने नोव्हेंबर २०१४ मध्ये केळीबाग रोडची प्रस्तावित रुंदी २४ मीटर केली होती. त्यामुळे येथील दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून हा रस्ता रखडला होता. 

दोन वर्षांपासून पुन्हा या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. राज्याच्या राजकारणाचे प्रमुख स्थान असलेल्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याचीही जागा संपादित करण्यात आली. परंतु काही दुकानदारांचा विरोध कायम होता. न्यायालयाने दुकानदारांचा अडथळा दूर केल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

भूसंपादन विभागाने येथील जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली. उद्या, ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता उपविभागीय व भूसंपादन अधिकारी सेंट्रल एव्हेन्यू ते बडकस चौक तसेच कोतवाली पोलिस स्टेशन ते सीपी ॲन्ड बेरार कॉलेजपर्यंतच्या एकूण ३३ मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात देणार आहे. त्यामुळे महापालिकेची रस्ता रुंदीकरणाची मोठी समस्या निकाली निघाली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally NMC can resume work of Kelibag Road widening