पत्नी माहेरी गेली अन् पतीने केले दुसरे लग्न, पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

विजयकुमार राऊत
Sunday, 29 November 2020

पत्नीला कुठलीही माहिती न देता पतीने गेल्या ३ नोव्हेंबरला तुमसर येथील एका तरुणीशी लग्न केले. याबाबत पीडितेला समजताच तिने पतीचे घर गाठून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीने तिचे ऐकले नाही. त्यामुळे तिने जुने कामठी पोलिस स्टेशन गाठून पोलिस निरीक्षक विजय मालचे यांना आपबिती सांगितली.

कामठी (जि. नागपूर ) : जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या खैरी येथे वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहणारी विवाहित महिला माहेरी गेली असता पतीने दुसरे लग्न उरकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडितेने पोलिस ठाणे गाठून पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४० तरुणांना दिला रोजगार

नागपूर येथील रहिवासी असणाऱ्या तरुणीचे १५ डिसेंबर २०१७ला कामठी तालुक्यातील खैरी येथील रहिवासी इमरान अली सय्यद (२५)याच्याशी लग्न झाले. काही दिवसानंतर पतीने तिला मारपीट करायला सुरुवात केली. त्यानंतर मुले होत नाही म्हणून छळ सुरू केला. तसेच माहेरून हुंडा आणण्याचा तगादा लावला. इतकेच नाहीतर, तिच्या भावाला बोलावून पत्नीला माहेरी नेण्यास सांगितले. सततच्या त्रासाला कंटाळून तिने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या सहा महिन्यांपासून ती माहेरी राहत आहे.

हेही वाचा - यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण;...

पत्नीला कुठलीही माहिती न देता पतीने गेल्या ३ नोव्हेंबरला तुमसर येथील एका तरुणीशी लग्न केले. याबाबत पीडितेला समजताच तिने पतीचे घर गाठून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीने तिचे ऐकले नाही. त्यामुळे तिने जुने कामठी पोलिस स्टेशन गाठून पोलिस निरीक्षक विजय मालचे यांना आपबिती सांगितली. मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून, पती इमरान अली सय्यद (२५), सासरे हमीद अली सय्यद (४५),  सासू नुराजहा हमीद अली सय्यद (४०) या तिघांविरुदध  मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against husband and his family for mental abused of wife in kamptee of nagpur