
शेखर शिरभाते यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी रेल्वेचा डबा बुक केला होता. त्यांच्या पार्टीत अनेकजण सहभागी झाले होते. त्यात काही तृतीयपंथी यांनी नृत्य, तर काही कार्यकर्त्यांचा जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
नागपूर : मेट्रो रेल्वेत गोंधळ घालणारे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
शेखर शिरभाते यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी रेल्वेचा डबा बुक केला होता. त्यांच्या पार्टीत अनेकजण सहभागी झाले होते. त्यात काही तृतीयपंथी यांनी नृत्य, तर काही कार्यकर्त्यांचा जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मेट्रो रेल्वेच्यावतीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार बर्डी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा आपल्या भाषणातून शहराची बदनामी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्यावतीने आज सोमवारी पोलिस आयुक्तांना भेटून प्रशांत पवार यांच्यासह नगरसेवक दुनेश्वर पेठे, माजी नगरसेवक राजेश माटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
मेट्रो रेल्वेमध्ये असे नेहमीच घडते. आम्ही वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे मुद्दामच हा प्रकार करून त्याचे छायाचित्रण केल्याचा दावा प्रशांत पवार यांनी केला. आम्ही मेट्रो रेल्वेमध्ये सुरू असलेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली नाही. तेव्हा भाजपच्या एकाही नेत्याने पोलिसांकडे निवेदन दिले नाही वा कारवाई करण्याची मागणी केली नाही. आता आम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेट्रो रेल्वेत सुरू असल्याने घोटाळ्याची तक्रार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.