esakal | Video धापेवाडा येथील महालक्ष्मी जिनिंगला आग
sakal

बोलून बातमी शोधा

Fire at Mahalakshmi Jinning Dhapewada

आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्या. सा

Video धापेवाडा येथील महालक्ष्मी जिनिंगला आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमेश्वर  : टान्सफॉर्मरवर माकडाने उडी घेतल्याने शॉर्टसर्किट होऊन धापेवाडा येथील जिनिंगमध्ये शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी आग लागली. या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. सदर जिनिंग इंडरचंद्र डागा, नंदलाल टावरी यांची आहे. आग आटोक्‍यात आणण्यासाठी नगर परिषद कळमेश्वर, खापा, सावनेर, मोहपा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

जिनिंगमधील शेतकरी आणि मजुरांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, हवेमुळे अल्पावधीत आगीने उग्ररूप धारण केले. आग लागली त्या वेळेला तालुक्‍यातील असंख्य शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी आणला होता. सुदैवाने सर्व शेतकऱ्यांचा कापूस बचावला. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्या. सावनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रण मिळविले.


यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, खरेदी-विक्री विक्री समिती अध्यक्ष बाबा कोढे, बाजार समितीचे सभापती बाबा पाटील, पंचायत समिती सभापती दादा भिंगारे, आशीष देशमुख, सरपंच सुरेश डोंगरे घटनास्थळी हजर झाले.

 क्षणिक सुखासाठी विवाहित महिला-पुरुष ठेवतात विवाहबाह्य संबंध अन्‌ विस्कटते संसाराची घडी
 

कापूस खरेदीबाबत संभ्रम


आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना धक्‍का बसला असून, कापूस खरेदी होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष बाबाराव कोढे यांनी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी कळमेश्वर तालुक्‍यातील इतर जिनिंगमध्ये पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत 3700 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, केवळ 120 शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांचे मोजमाप झालेले नसल्याचे सांगण्यात आले.