बाहेर फिरणाऱ्या कोरोना बाधितावर पाच हजारांचा दंड, शहरात पहिल्यांदाच दंड वसूल

five thousand fine on corona positive patients who is walking out from home
five thousand fine on corona positive patients who is walking out from home
Updated on

नागपूर :  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बाहेर फिरणाऱ्या बाधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढल्यानंतर अनेक बाधित बिनधास्त फिरत आहेत. अशाच एका घराबाहेर फिरणाऱ्या बाधितावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत त्याच्याकडून पाच रुपये दंड वसूल केला. शहरात बाधितावर ही पहिलीच कारवाई आहे. 

आशीनगर झोनअंतर्गत महेन्द्रनगरमध्ये राहणारा कोरोनाबाधित रुग्ण घराचा बाहेर फिरत असल्याची माहिती परिसरातील एका नागरिकाने मनपाच्या उपद्रव शोध पथकाला दिली. पथकाने ताबडतोब निश्चित पत्त्यावर पाहणी केली असता बाधित बाहेर फिरत असल्याचे आढळला. याशिवाय लॉकडाउनच्या नियमाचा भंग करणाऱ्या १२ दुकाने, प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,०६,००० चा दंड वसूल केला. यात केडब्ल्यूई एक्स्प्रेस लिमिटेडचा समावेश असून व्यवस्थापनाकडून २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. 

आयुक्तांनी केली बाधितांच्या घराची पाहणी -
आयुक्तांनी गोरेवाडा भागात आरआरटी पथकासोबत कोरोनाबाधितांच्या घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त राम जोशी व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. गृह विलगीकरणमध्ये बाधित नियमांचे पालन करीत आहे की नाही याची तपासणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com