वनविभागाने रामटेक तालुक्यातील महिलांना या माध्यमातून दिला रोजगार.. वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे 18 हजार कुटुंबांना तेंदूपाने व गौण वनोपजाच्या संकलनाद्वारे रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असला तरी मोबदला अत्यल्प मिळतो. मोठ्या प्रमाणात गौण वनोपजाचे संकलन केल्यास त्याचा विपरीत परिणाम जंगलावर होण्याची शक्‍यता आहे.

नागपूर : वनालगतच्या नागरिकांना गावालगतच रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने नागपूर वन विभागाने महिला बचत गटाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण वनामृत प्रकल्प सुरू केला आहे. सद्यस्थितीत रामटेक तालुक्‍यातील 9 गावांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित असून त्यात 20 महिला बचत गट सहभागी आहेत. त्यामुळे 200 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे 18 हजार कुटुंबांना तेंदूपाने व गौण वनोपजाच्या संकलनाद्वारे रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असला तरी मोबदला अत्यल्प मिळतो. मोठ्या प्रमाणात गौण वनोपजाचे संकलन केल्यास त्याचा विपरीत परिणाम जंगलावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वनामृतासारखे प्रकल्पे निर्माण करून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वन विभागाचा आहे. पेंच, बोर, ताडोबा- अंधारी, नवेगाव- नागझीरा व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे कॉरिडोरमध्ये बहुतांश गावे येतात. गेल्या तीन वर्षात नागपूर वनविभांतर्गत वन्यप्राण्यामुळे अंदाजे 16000 शेतपिक नुकसानीची 1423 पशुहानीच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व समस्यांचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी वनांवर आधारीत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे, हा उत्तम पर्याय आहे. 

यातूनच वनाबाबत ग्रामस्थांमध्ये आपुलकी भावना निर्माण होईल. वनाचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ला यांनी सांगितले. वनामृत प्रकल्पाचा सुक्ष्मकृती आरखडा तयार करण्यात आला असून रामटेक तालुक्‍यात राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प महिला बचत गटामार्फत राबविण्यात येत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन व महिला बचत गट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येवून गौण वनोपजांचे संकल्प विनामुल्य करण्याचे सुनिश्‍चित करण्यात आले आहे. 

तयार होणारे उत्पादन 
आवळा ज्युस, कॅन्डी, मुरब्बा, लोणचे, जॅम, पावडर, बेल ज्युस, मुरब्बा, चिंचेची कॅन्डी, जॅम, सॉस, जामून ज्युस, मोहा जॅम, ज्युस, किसमीस, निम पावडर, निम साबुन, निमबोरी, निम साबनासाठी आईल, पळस फ्लावर ज्युस, सिताफळ मुरब्बा, करवंद लोणचे. महिला बचत गटातील माहिलांमार्फत कापडी पिशव्या, गांडूळ खत, पापड.

 - सावध व्हा, सॅनेटायझर दान देण्याच्या नावावर तरुणास बसला मोठा फटका, वाचा हा प्रकार...

वैशिष्ट्ये 
- प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन. 
- उत्पादनांचे विक्रीवर लक्ष केंद्रित करणे. 
- अंमलबजावणीकरीता स्वतंत्र यंत्रणा व योग्य संनियंत्रण. 
- प्रशिक्षण, उत्पादन डिझाईन, सर्व नोंदणी करणे व मार्केटिंग 

उत्पादन हवे असल्यास 
वनामृत कॅम्पस ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर, सेमिनरी हिल्स, नागपूर मोबाईल क्रमांक ः 7972368008 
ई मेल : info@vanamrut.com 
वेबसाईट : www.vanamrut.com 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forest department scheme for womens