नागपुरात हत्याकांडांचे सत्र; गेल्या ३ दिवसात ४ हत्या; यशोधरानगरात युवकाचा खून 

अनिल कांबळे 
Wednesday, 18 November 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अन्सारी हा इंड्रस्ट्रीयल एरीयातील एका फॅक्ट्रीमध्ये कामगार होता. तो मंगळवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास ड्युटीवर जात होता. 

नागपूर ः ड्युटीवर जात असलेल्या एका युवा मजुराची तिघांनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास यशोधरानगरात उघडकीस आली. मोहम्मद तहसीन मोहम्मद मुबीन अन्सारी (२३, गरीब नवाजगनर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप आरोपीबाबत कोणताही सुगावा पोलिसांनी लागला नसून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. गेल्या तीन दिवसांतील उपराजधानीतील चवथे हत्याकांड आहे.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अन्सारी हा इंड्रस्ट्रीयल एरीयातील एका फॅक्ट्रीमध्ये कामगार होता. तो मंगळवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास ड्युटीवर जात होता. योगी अरविंद नगरातील बर्फ फॅक्ट्रीजवळ अन्सारी याला तीन आरोपींनी अडविले. अन्सारीला तिघेही बेदम मारहाण करीत होते.

नक्की वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

दरम्यान नासीर अहमद शब्बीर अहमद (४१, पवननगर) हे त्याच रस्‍त्याने बहिणीच्या घरी जात होते. त्यांना अन्सारी यांना मारहाण होत असल्याचे दिसले. ते धावतच घटनास्थळावर पोहचले.

तिघापैकी एका युवकाने धारदार चाकू अन्सारीच्या पोटात भोसकला. नासीर यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यामुले तिनही आरोपी पळून गेले. नासीर यांनी जखमी अन्सारीला ॲटोने मेयो रूग्णालयात नेले. परंतु. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी नासीर अहमद याच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू ​

लुटमारीतून घडले हत्याकांड !

मोहम्मद अन्सारी हे ड्युटीवर जात असताना तिघांनी त्यांची वाट अडवत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. अन्सारीने लुटमार करण्यात प्रतिकार करीत विरोध दर्शविल्यामुळे आरोपींनी अन्सारी याला मारहाण केली. कुणीतरी धावत आपल्याकडे येत असल्यामुळे आरोपींनी अन्सारीचा खून केला, अशी चर्चा आहे.मात्र खरे कारण पोलिस तपासात समोर येईल. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four crimes in three days in Nagpur