दोनच महिन्यांपूर्वी बाप झालेल्या युवकाने आजाराला कंटाळून घेतला गळफास

योगेश बरवड
Saturday, 3 October 2020

अशोक वाटिका, कोराडी रोड येथील रहिवासी नरेश मोहदीया (४५) हे २० सप्टेंबर रोजी सायंकाळी वाहनाने कुणाल हॉस्पिटलजवळून घरी जात होते. मानकापूर उड्डाणपुलावर अचानक म्हैस आडवी आली. तिला धडकून मोहदीया वाहनावरून पडून जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नागपूर : शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. मानकापूर हद्दीत मोकाट म्हैस आडवी आल्याने वाहनचालकाचा मृत्यू झाला. उपचारासाठी मेडिकलमध्ये नेत असताना नवजात बाळ दगावले. तर दोघांना आत्महत्या केली. आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नंदनवन हद्दीत उघडकीस आली. रोशन लाडेकर (३१) रा. कुंभार टोली, जुना बगडगंज असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या ७-८ वर्षांपासून तो ॲसीडीटमुळे त्रस्त होता. खासगी काम करीत तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत होता. दीडच वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. दोनच महिन्यांपूर्वी मुलीचा बाप बनला. कन्यारत्न प्राप्त झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. पण, शारीरिक व्यधीमुळे तो तणावात राहत होता.

अधिक वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पत्नी मुलीला खेळवीत होती. खोलीत कुणी नसताना वरच्या माळ्यावरील बेडरूम मधील सिलिंग फॅनला साडीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. साडेनऊ वाजताच्या सुमारात पत्नी त्याला उतरविण्यासाठी गेली असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला.

अशोक वाटिका, कोराडी रोड येथील रहिवासी नरेश मोहदीया (४५) हे २० सप्टेंबर रोजी सायंकाळी वाहनाने कुणाल हॉस्पिटलजवळून घरी जात होते. मानकापूर उड्डाणपुलावर अचानक म्हैस आडवी आली. तिला धडकून मोहदीया वाहनावरून पडून जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

शारदानगरातील रहिवासी श्वेता यांची प्रसुती डागा रुग्णालायात झाली होती. चार दिवसांनी बाळाची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी मेडिकलला रेफर करण्यात आले. तिथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. छावणी येथील रहिवासी अनिल शिर्के (६०) यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी फुटाळा तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four died in various incidents in the city