नागपुरात तरुण व्यावसायिकाची फसवणूक; चालवायला दिलेली कारही गेली, ना बँकेचे भरले हप्ते

fraud with property broker in nagpur
fraud with property broker in nagpur

नागपूर : ठरल्याप्रमाणे कारचे हप्ते न फेडता प्रॉपर्टी ब्रोकरचा विश्वासघात करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निरंजन मनोहरे (३८) रा. इसासनी, असे आरोपीचे नाव आहे.

तो खादी ग्रामोद्योगमध्ये खासगी वानहचालक म्हणून कामाला होता, सोबतच कर्जही मिळवून द्यायचा. त्याच्या मदतीने ठाकरे ले-आउट येथील रहिवासी राहुल बागडे (३३) यांनी २०१७ मध्ये बँकेतून पाच लाखांचे कर्ज मिळवले होते. तेव्हापासून दोघांची ओळखी होती. आरोपी निरंजननेच एखादे सेकंडहॅन्ड चारचाकी वाहन खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. राहुलने जानेवारी २०१८ मध्ये एक सेकंडहॅन्ड कार बँकेत १५ हजार रुपये भरून घेतली होती. नोव्हेंबर २०१८ पर्यंत दरमहा ५ हजार रुपये बँकचा हप्ताही भरला. ही कार निरंजनला चालविण्यासाठी दिली.

बँकेचे पुढील हप्ते भरण्याचेही त्याने मान्य केले होते. पण, दोन महिने हप्ते भरल्यानंतर पुढील सर्वच हप्ते बुडवले. बँकेकडून फोन आल्याने आरोपीने हप्ते भरले नसल्याची बाब स्पष्ट झाली. राहुलने फोन करून या प्रकाराबाबत जाब विचारला असता आरोपीने सर्व हप्ते भरणार असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पण, हप्ते मात्र भरले नाही. दरम्यान, आरोपी पुण्याला राहायला गेला. राहुल याने पुण्याला जाऊन बघितले असता त्याने दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने कारही परत दिली नाही आणि हप्तेही भरले नाही. राहुलने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com