esakal | खुशखबर! नागपुरात नागरिकांना मिळणार मोफत ‘इम्युनिटी पॉवर डोज; सभेत मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने होमियोपॅथिक आरसेनिक एलबम ३० या औषधीचे वितरण करण्यासाठी ८० लाखांचा खर्च करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.

खुशखबर! नागपुरात नागरिकांना मिळणार मोफत ‘इम्युनिटी पॉवर डोज; सभेत मंजुरी

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर :चौदाव्या वित्त आयोगांतर्गत जि.प.ला मिळालेल्या निधीवर १ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज मिळाले. यानिधीतून ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने होमियोपॅथिक आरसेनिक एलबम ३० या औषधीचे वितरण करण्यासाठी ८० लाखांचा खर्च करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विरोधकांच्या बहिष्कारानंतर तांत्रिक अडचणी वगळता सुरळीत पार पडली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी जिल्ह्यात २० ऑक्टोबरपर्यंत १९ हजार ६५९ रुग्ण आढळून आल्याचे सांगत १७ हजार २३९ रुग्ण बरे झाल्याची माहिती सभागृहाला दिली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२० असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या ग्रामीण भागात १८७१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या ५४९ असल्याचे सांगितले. शिवाय कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचार सुरू असल्याचे सांगत निरंतर सर्वे आहे.

तेराशे गावांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री‘ ;जि.प.चे नियोजन यशस्वी

जि.प.सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची गत महिनाभरापासून सर्वे सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली. येत्या आठवड्याभरात सर्वे पुर्ण करून शेतकऱ्यांना २५ हजार मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. शिवाय काही तलाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन बोगस सर्वे करीत असल्याची माहिती सभागृहाला दिली. तसेच पालकमंत्री पांधन रस्त्यांची कामे जि.प.मार्फतच करण्याचा प्रस्ताव मांडला. व्यासपीठावर उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, वित्त व शिक्षण सभापती भारती पाटील, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, समाज कल्याण सभापती नेमावली माटे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रमिला जाखलेकर उपस्थित होत्या.

 
go to top