मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत; १० हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ 

Free school bags for backward class students
Free school bags for backward class students

नागपूर : महापालिका शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसोबत पाण्‍याची बॉटल मोफत देण्याच्या प्रस्तावाला दुर्बल घटक समितीने हिरवी झेंडी दिली. १० हजार गरीब विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

महापालिकेत दुर्बल घटक समितीची बैठक पार पडली. बैठकीत दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, समिती सदस्य आशा उईके, राजेंद्र सोनकुसरे, रुतिका मसराम, विद्या मडावी, वंदना भगत, नेहा निकासे, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

सभापती कुमरे यांनी मनपा शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाटर बॉटल वाटपासंबंधी आढावा घेतला. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत एकूण १९ हजार ३३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी १० हजार ७८० मागासवर्गीय विद्यार्थी आहेत.

या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाटर बॉटल आदी शैक्षणिक साहित्य वाटपासाठी मनपाला सुमारे ५०० रुपये प्रति विद्यार्थी एवढा खर्च येणार आहे. १० हजार ७८० विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ लाख रुपये एवढा खर्च प्रस्तावित असून संपूर्ण खर्च शिक्षण विभागाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी दिली.

मनपाच्या शाळेतील एकूण विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देताना त्यांना चांगल्या प्रतीचे शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी दुर्बल घटक समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली. सर्व विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीची स्कूल बॅग व वाटर बॉटल देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश समिती कुमरे यांनी दिले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com