बनवाबनवी अशी ही बनवाबनवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

वेगवेगळ्या थापामारीत डेबीट कार्डची माहिती आणि ओटीपी विचारून बॅंक खात्यातून रक्कम लांबविण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. जनजागृतीचे अनेक प्रयत्न करूनही अशा घटनांना आळा घालणे शक्‍य होऊ शकले नाही. डेबीट कार्ड व ओटीपीची माहिती घेऊन दोघांच्या खात्यातून सुमारे अडीच लाख रुपये लंपास करण्यात आल्याच्या दोन नव्या घटना उघडकीस आल्या आहेत.

नागपूर : जेवढे तंत्रज्ञान विकसित होते आहे, तेवढीच ऑनलाईन गुन्हेगारीही वाढते आहे. दर दिवसागणिक बॅंक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या घटना ऐकू येतात. सुशिक्षित व्यक्‍तीही अशी फसवणुकीला बळी पडतात. ही वस्तुस्थिती आहे. आपली थोडीशी बेपर्वाई आपल्याला लराखो रुपयांवर पाणी सोडायला भाग पाडते. वेगवेगळ्या थापामारीत डेबीट कार्डची माहिती आणि ओटीपी विचारून बॅंक खात्यातून रक्कम लांबविण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. जनजागृतीचे अनेक प्रयत्न करूनही अशा घटनांना आळा घालणे शक्‍य होऊ शकले नाही. डेबीट कार्ड व ओटीपीची माहिती घेऊन दोघांच्या खात्यातून सुमारे अडीच लाख रुपये लंपास करण्यात आल्याच्या दोन नव्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सविस्तर वाचा - अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

 

लक्ष्मीनगरातील रहिवासी कल्याण सेन (65) हे 1 फेब्रुवारी 2018 रोजी बुटीबोरी येथील हिंदुस्थान उद्योग लिमिटेड नावाच्या फॅक्‍टरीत उपस्थित होते त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने एसबीआय मुख्यालयातून व्यवस्थापक बोलत असल्याची थाप मारली. डेबीटकार्ड ब्लॉक करण्यात आले आहे, ते चालू करायचे असल्यास मोबाईलवर लिंक पाठवित असून ती परत आपल्या मोबाईलवर फॉरवर्ड करण्याची सूचना केली. सोबतच त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीसंदर्भात विचारणा केली. ओटीपी मिळताच त्यांच्या खात्यातून 1 लाख 99 हजार 998 रुपये आरोपीने काढून घेतले होते.
याचप्रमाणे घरसंसार सोसायटी, हिवरीनगर येथील रहिवासी राकेशकुमार गुप्ता (37) यांना 27 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बॅंकेचा मॅनेजर बोलत असल्याची थाप मारून आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्डची माहिती घेतली. मोबाईलवर आलेला ओटीपी विचारून घेतला. काही वेळातच त्यांच्या खात्यातून 49 हजार 997 रुपये काढून फसवणूक केली. दोन्ही प्रकरणांमध्ये नंदनवन व बजाजनगर पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: frod of 2 lacs by hackers