esakal | मला स्पोर्ट कोट्यातून नोकरी लागली असून पुणे वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे, तू फक्त...
sakal

बोलून बातमी शोधा

The future wife was robbed of six lakh rupees

गलेलठ्‌ठ पगार असून भंडाऱ्यात टोलेजंग घर असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर स्नेहाचा विश्‍वास बसला. रूपेशला स्नेहाने नागपुरात बोलावले आणि आपल्या घरच्यांशी भेट घालून दिली. मुलाला स्विकारण्यासह लग्न करण्याची तयारी त्याने दर्शविली. 

मला स्पोर्ट कोट्यातून नोकरी लागली असून पुणे वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे, तू फक्त...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आधीच विवाहित असताना विवाह नोंदणी संकेतस्थळावरून एका घटास्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून आयपील खेळण्यासाठी सहा लाख उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून गंडा घालणाऱ्या रूपेश शालीकराम धुरई (वय 34, तकिया, भंडारा) यास अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा ही अजनीत राहते. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. त्यानंतर स्नेहाने पतीपासून घटस्फोट घेतला. अजनी येथे मोठे बुटिक टाकले. तिने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्‍त केली. मात्र, जो कुणी मुलासह स्विकारेल त्याच्याशी लग्नगाठ बांधायची असे स्नेहाने ठरविले. त्यासाठी तिच्या नातेवाईकाने काही मुले बघितले परंतु तिला पसंत पडले नाहीत. तिच्या मैत्रिणीने तिचे विवाह संकेतस्थळावर प्रोफाईल बनवून दिले. तेव्हापासून ती संकेतस्थळावर जाऊन प्रोफाईल तपासून योग्य जोडीदार शोधत होती.

महत्त्वाची बातमी - शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

26 जून 2019 रोजी तिला भंडारा येथील रूपेश धुरई या युवकाचे प्रोफाईल दिसले. तिने रूपेशची माहिती काढली आणि मोबाईलवरून संपर्क साधला. रूपेश आणि स्नेहा यांच्यात मोबाईलवर मैत्री आणि त्यानंतर वॉट्‌सऍपवर चॅटिंग सुरू झाली. त्याने अविवाहित असून नॅचरल रिसोर्सेस विभागात शासकीय नोकरीवर असल्याचे सांगितले. गलेलठ्‌ठ पगार असून भंडाऱ्यात टोलेजंग घर असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर स्नेहाचा विश्‍वास बसला. रूपेशला स्नेहाने नागपुरात बोलावले आणि आपल्या घरच्यांशी भेट घालून दिली. मुलाला स्विकारण्यासह लग्न करण्याची तयारी त्याने दर्शविली. 

आयपीएल खेळण्याची ईच्छा 
रूपेशने स्पोर्ट कोट्यातून आपल्याला नोकरी लागली असून क्रिकेटर असल्याचे सांगितले. स्नेहाचा त्यावर विश्‍वास बसला. येणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पुणे वॉरीयर्स संघाकडून खेळणार असल्याचे सांगितले. त्यासाठी 50 लाख रुपये संघ व्यवस्थापनाला द्यायचे असल्याची थाप मारली. 44 लाखांची व्यवस्था केली असून केवळ 6 लाख रुपयांची मागणी केली. होणारा पती क्रिकेट खेळणार असल्यामुळे स्नेहाने मोहात पळून त्याला 6 लाख रुपये दिले.

क्लिक करा - शासन निर्देशानुसारच शाळा सुरु होणार, असे आहेत शासनाचे निर्देश

असा झाला भांडाफोड 
स्नेहा आणि रूपेश यांचे संबंध वाढत गेल्यानंतर लग्नाची तारीख ठरविण्यापर्यंत पोहचले. रूपेश हा देवीचा भक्‍त आहे. त्यामुळे तो कोराडी देवीच्या दर्शनासाठी पत्नी व मुलासह आला होता. तर त्याच दिवशी स्नेहा ही कुटुंबीयासह दर्शनासाठी आली. दर्शनाच्या लाईनमध्ये रूपेश पत्नीसह दिसला. रूपेशला स्नेहाच्या कुटुंबीयांनी घेरले. त्यावेळी पत्नीने रूपेशच्या कृत्याचा भांडाफोड केला.