मालवाहूची दुचाकीला धडक; तरुणी ठार, तर तरुण जखमी

सतीश दहाट
Thursday, 1 October 2020

रनाळा शिवारात कॅनलजवळील नवनिर्मित पुलाजवळ कामठीवरून नागपूरकडे जात असलेल्या मालवाहूने दुचाकीला जबर धडक दिली. तरुणी व तरूण दोघेही गंभीर जखमी झाले.

कामठी : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-कळमना मार्गावर कॅनलजवळील पुलाजवळ एका मालवाहू गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये तरुणी ठार, तर तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.३०) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक्षा प्रमोद मोहाडे (वय२१,लालगंज नागपूर,)असे मृत तरुणीचे नाव आहे. 

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन सुरेश भुजाडे (वय२३, रघुजीनगर नागपूर) हा दुचाकीने त्याची नातेवाईक प्रतीक्षा प्रमोद मोहाडे हिच्यासोबत नागपूरवरून कामठीकडे जात होते. रनाळा शिवारात कॅनलजवळील नवनिर्मित पुलाजवळ कामठीवरून नागपूरकडे जात असलेल्या मालवाहूने दुचाकीला जबर धडक दिली. तरुणी व तरूण दोघेही गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

नागरिकांनी दोघांनाही कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघांनाही मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान प्रतीक्षा मोहाडेचा मृत्यू झाला, तर अश्विन भुजाडेवर उपचार सुरू आहेत. नवीन कामठी पोलिसांनी दोन्ही वाहन ठाण्यात आणून अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक आसत्कर पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl died and one injured in road accident at kamathi in nagpur

Tags
टॉपिकस
Topic Tags: