विभागाला नाव देणे हा महापुरुषांचा अपमान; नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची टीका

Giving names to departments is insult of ideal person said students
Giving names to departments is insult of ideal person said students

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसराला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असताना येथील मानव्यशास्त्र विभागाला दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्याचा निर्णय हा विशिष्ट विचारधारेचे पाईक आणि स्वार्थबुद्धीने घेतल्याची टीका विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, या विभागाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दोन वर्षांपूर्वी सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांनी कुलगुरूंकडे केली होती. मात्र, त्यावेळी असे करणे संयुक्तिक नसल्याचे सांगण्यात आले होते.

नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. निर्मलकुमार सिंग यांनी स्व. दंत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विद्यापीठ परिसरातील मानव्यशास्त्र विभागाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला. बहूमताने हा प्रस्तावही मान्य करण्यात आला. मात्र, या प्रकाराने अनेकांच्या भावना दुखावल्या असून युवक काँग्रेससह आता विद्यार्थ्यांनीही याचा विरोध करायला सुरुवात केली आहे.

सध्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी या नामकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी नागपूर विद्यापीठाला भेट देणार आहेत. यावेळी त्यांनी नागपूर विद्यापीठामध्ये शैक्षणिक उपक्रम सोडून महात्मा फुलेंच्या परिसरातील विभागाला दत्तोपंत ठेंगडींचे नाव देण्याच्या प्रकाराचा समाचार घ्यावा अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भूषण वाघमारे यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com