गौरव राशीचे लिफाफे अद्यापही रिकामेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

गौरव राशी मिळाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर विद्यापीठाच्या वतीने राज्य, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गौरवण्यात येते.

नागपूर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गौरव वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले रिकामे लिफाफे भरण्याचे आदेश कुलगुरूंनी दिल्यानंतरही अद्याप त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही.

ब्रेकिंग - पती-पत्नीने घेतले विष आणि...

गौरव राशी मिळाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर विद्यापीठाच्या वतीने राज्य, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गौरवण्यात येते. विद्यापीठाने चार ऑक्‍टोबर 2019 ला गुरुनानक भवनमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवले. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांचा चक्क रिकामे लिफाफे देऊन सत्कार केला होता. यानंतर विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, सत्काराचा कार्यक्रम आटोपून तीन महिन्यांनंतरही विद्यापीठाने पैसे जमा न केल्याचे वृत्त पुढे येताच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, कुलगुरूंच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले नाही. प्रोत्साहन राशीसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूदही केली जाते. यानुसार राष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 10हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये दिले जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील विजेत्यांना 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये देण्यात येतात. विद्यापीठाने एकतर दोन वर्षांनंतर विजेत्यांचा सत्कार केला आणि पैसेही दिले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The glory zippers still empty