आयुर्वेदिक औषधांना सुवर्णकाळ; प्रतिकारशक्ती वाढविण्यावर नागरिकांचा भर

राजेश रामपूरकर
Thursday, 19 November 2020

लॉकडाऊनच्या काळात काही औषधांचा तुटवडा भासत होता. त्यामुळे औषधांचे दर वाढले आहेत. राज्य सरकारने विविध सरकारी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून दिल्यास त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.

नागपूर : कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीत शंभर टक्के वाढ झालेली आहे. गुळवेल, तुळस, महासुदर्शन काढा, आसवारिष्ठ, सफेद मुसळी, अडुळसा, गुग्गुळ आदींची मागणी वाढली होती. त्यामुळे जवळपास सर्वच आयुर्वेदिक औषधनिर्मात्या कंपन्यांनी त्यांचे दर वाढवले आहेत.

केंद्रीय आयुष मंत्रालयानेही कोरोनाचा धोका टाळण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यामध्ये तुळस, मिरे, सुंठ, लवंग, ज्येष्ठमध आदींचा समावेश असलेला आयुष काढा, च्यवनप्राश आदी औषधे सुचवली होती. या औषधांच्या सेवनावर अनेकांनी भर दिला.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

त्यासोबतच अश्वगंधा, गुळवेल, महासुदर्शन काढा, यष्टीमधू घनवटी, गुडुची घनवटी, आसवारिष्ठ, गुग्गुळ, च्यवनप्राश अशा विविध आयुर्वेदिक औषधांची शंभर टक्के मागणी वाढली. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांना सोनेरी काळ अनुभवायला मिळाला.

कोरोना काळात सुवर्णभस्म महागल्याने त्याचा वापर होणारी औषधेही महागली होती. मात्र, आता या औषधांचे दर आवाक्यात आले आहेत. कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढलेली आहे. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकांनी आयुर्वेदिक औषधे घेण्यास प्राधान्य दिले. आयुष मंत्रालयानेही विविध आयुर्वेदिक औषधे सुचवली होती. त्यामुळे मागणी प्रचंड वाढली होती.

अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

लॉकडाऊनच्या काळात काही औषधांचा तुटवडा भासत होता. त्यामुळे औषधांचे दर वाढले आहेत. राज्य सरकारने विविध सरकारी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून दिल्यास त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.

किमती प्रचंड वाढल्या

लॉकडाऊनच्या काळात कच्चा माल, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा करताना औषधनिर्मात्या कंपन्यांना अडचण येत होती. सुंठ, हिरडा-बेहडा, पिंपळमूळ, कुटकी मूळ, दालचिनी, पिंपली, सोनामुखी आदी वनौषधांच्या किमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढल्या. त्यामुळे औषधांचे दर वाढले आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

क्लिक करा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला आहे भारी

तात्पुरती दरवाढ
गंभीर कोरोनाग्रस्तांना सुवर्णभस्म, सुवर्णकल्पाचा मोठा फायदा झाला. त्याचबरोबर गुळवेल, तुळस, महासुदर्शन काढा, आसवारिष्ट, गुग्गुळ आदी काढ्यांनाही मागणी वाढली होती. कमी पुरवठा, लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीवरील निर्बंध अशा विविध कारणांमुळेही दरवाढ झाली आहे. ही तात्पुरती दरवाढ असून पुढील वर्षी चांगले उत्पादन आल्यानंतर भाव पुन्हा घसरतील.
- राधेश्याम गुप्ता,
संचालक, शिवशंकर आयुर्वेदिक केंद्र

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Age of Ayurvedic Medicine