अरे हे काय... बेबी केअर किटची योजना गुंडाळली, पण का जाणून घ्या

The government discontinued 'Baby Care Kit' scheme
The government discontinued 'Baby Care Kit' scheme

नागपूर  : भाजप काळातील अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका बालमृत्यू रोखण्यासाठी नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या ‘बेबी केअर किट’ योजनेलाही बसला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या योजनेकरता यंदा निधीचीच तरतूद करण्यात आली नाही. विशेष म्हणजे याकरिता मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी कीटसाठी नोंदणी केली आहे.

विकसित देशांमध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी बेबी केअर किटचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेशात नवजात बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. त्यात धर्तीवर महाराष्ट्रातही बेबी केअर कीटचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. २६ जानेवारी २०१९ पासून ही योजना सुरू केली. त्यासाठी शासनाने ८० लाख रुपयांची तरतूद करून ४ लाख ८७५ बेबी केअर कीट खरेदी केल्या होत्या.

प्रसूतीनंतर अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून महिलांना त्या उपलब्ध करून दिल्या जात होत्या. यात लहान बाळांचे प्लास्टीक लंगोट, कपडे, टॉवेल, तापमापक यंत्र, झोपण्याची लहान गादी, मच्छरदाणी, गुंडाळण्यास कापड, तेल, ब्लँकेट, शॅम्पू, खेळणी, नेलकटर, हात व पायसाठी मोजे, बॉडी वॉश आदींचा समावेश होता. 

शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणाचे नाव नोंदणी केलेल्या पहिल्या प्रसूतीस जन्मास येणाऱ्या बाळाला २ हजार रुपये किमतीची बेबी केअर किट एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत उपलब्ध करून दिली होती. ५५३ प्रकल्पस्तरावर त्याचा पुरवठा करण्यात आला होता. पण, त्यानंतर या योजनेत कुठलीही तरतूद झालेली नाही. अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरोदर मातांची नोंदणी झाली आहे. त्यांची प्रसूतीही झाली आहे. त्यांच्याकडून बेबी केअर किटचे मागणी होत आहे; पण पुरवठाच करण्यात आला नाही. 

संपादन : अतुल मांगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com