बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या नव्या सूचना जाहीर, वाचा...

नीलेश डोये
शनिवार, 11 जुलै 2020

रात्रीच्या वेळेस बिअर बारमध्ये दारू पिणाऱ्यांची मोठी झुंबड असायची. शहरातले जवळपास सर्वच बिअर बारमध्ये पिणाऱ्यांची गर्दी दिसत होती. शौकीनांमध्ये येथे "चिअर्स' करण्याची एकप्रकारे होडच लागल्याचे चित्र पाहायाला मिळत होते. परंतु, कोरोनामुळे देशात लॉकडाउन झाला आणि नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.

नागपूर : लॉकडाउन करतेवेळी बिअर बारमध्ये असलेला दारूसाठाच विक्री करण्याची परवानगी सरकारने दिली होती. लॉकडाउननंतर दिलेल्या सूटमध्ये मोठ्या प्रमाणात बिअरची विक्री झाली. नागरिकांनी गर्दी केल्याने असलेला स्टॉक संपला. यामुळे अनेक बिअर बार चालकांकडे साठाच उपलब्ध नाही. मात्र, नागरिकांकडून मागणी काही कमी झालेली नाही. वाढती मागणी लक्षात घेतला सरकारने बिअर बार चालकांना नवीन दारू विकत घेऊन विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, बिअर बारमध्ये बसून पिण्यास मनाई आताही कायम आहे. 

रात्रीच्या वेळेस बिअर बारमध्ये दारू पिणाऱ्यांची मोठी झुंबड असायची. शहरातले जवळपास सर्वच बिअर बारमध्ये पिणाऱ्यांची गर्दी दिसत होती. शौकीनांमध्ये येथे "चिअर्स' करण्याची एकप्रकारे होडच लागल्याचे चित्र पाहायाला मिळत होते. परंतु, कोरोनामुळे देशात लॉकडाउन झाला आणि नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. यामुळे "रात्री बसण्याच्या' प्रकाराला आळा बसला. यामुळे रात्रीच्या होणाऱ्या दुर्घटनांवरही आळा बसला.

सविस्तर वाचा - हृदयद्रावक! त्या दोन जीवलग मित्रांची मैत्री सरणारवरही कायम...

लॉकडाउन लागू करताना जिवनाश्‍यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने, उद्योग, आस्थापना बंद करण्यात आल्या. वाईन शॉपसोबत बिअर बारही बंद करण्यात आले. यामुळे दारू शौकीनांची चांगलीच अडचण झाली. सरकारचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. जवळपास तीन महिन्यांनंतर वाईन शॉपमधून दारू विक्रीस परवानगी देण्यात आली. यातही शहरी भागात लॉनलाईन दारूविक्री असून, ग्रामीण भागात वाईन शॉपमधून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. बिअर बार बंद ठेवण्यात आले. 

बिअर बारमधील साठा तसाच राहिल्याने मालकांचे होणारे नुकसान लक्षात घेता बिअर बारमधील साठा विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली. बारमध्ये बसून पिण्यास मनाई असून, फक्त "पार्सल' देण्यास परवानगी दिली आहे. अनेक बिअर बारमधील साठा संपला. त्यांना नव्याने मालाची विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याने आर्थिक संकट ओढवण्याची भीती अनेकांनी व्यक्ती केली. त्यामुळे आता त्यांना नव्याने दारूचा साठा करून विक्री करण्यास परवागनी देण्यात आली आहे.

हेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

बारमध्ये बसून पिण्यास मनाई

कोरोनामुळे सर्वाधिक तडफले असेल ते म्हणजे तळीराम. रोज दारू पिण्यासी सवय असल्याने त्यांची मोठी अडचण झाली. कारण, सरकारने दारू विक्रीवर बंदी लादली होती. काही काळानंतर सरकारने दारूव्रिकीस परवानगी दिली. यामुळे दारुड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद पसरला होता. मात्र, साठा संपल्याने पुन्हा अडचण झाली. आता सरकारने बिअर विकत घेऊन विक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, बारमध्ये बसून पिण्यास अद्यापही मनाई आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government new instructions for beer bars