विदर्भात येणार मोठे उद्योग, सरकार प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

विदर्भासह राज्याची उद्योगजगताची वाढ कमी होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विदर्भात उद्योग सुरु करताना लागणारी परवानगीची कागदपत्रे विदर्भातच मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले.

नागपूर : विदर्भात मोठे उद्योग आणताना त्यासाठी ग्रोथ इंजिन ठरू शकणाऱ्या घटकांना चालना देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल. केवळ उद्योगच नाही तर येथे खाण प्रकल्प, पर्यटनवाढीवर भर देणे आवश्‍यक आहे. मोठ्या उद्योगांचा विचार करताना, त्याला पूरक विविध छोट्या उद्योगांचीही वाढ करावी लागणार आहे. विदर्भातील खाण व्यवसायाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात मोठा कारखाना उभारणीची घोषणा केली आहे. त्यामुळे ऍडव्हॉंटेज विदर्भासारखा इनक्रेडीबल विदर्भ उपक्रम विचाराधीन आहे. विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन तत्पर असून, उद्योगांना लागणारी वीज अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मात्र, त्यासोबतच उद्योजकांनी सौरऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करावी असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. वस्त्रोद्योग निर्मिती उद्योजकांनी ऊर्जामंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

विदर्भासह राज्याची उद्योगजगताची वाढ कमी होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विदर्भात उद्योग सुरु करताना लागणारी परवानगीची कागदपत्रे विदर्भातच मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढेंची पंचिंग मशीनलाही वाटते भीती, वाचा काय झाले...

 

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने उद्योगभवन येथे आयोजित केलेल्या उद्योजकांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, प्रशांत मोहता, सुरेश अग्रवाल, राजेंद्र गोयंका, गौरव सारडा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले, विदर्भातील उद्योगांना पोषक वातावरण आहे. उद्योगांना हवी तशी गती मिळत नाही. हिंगणा, बुटीबोरी, मिहान औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचा विकास करताना उद्योजकांनी येत असलेल्या अडचणींबाबत प्रस्ताव सादर करावेत. नागपूर तसेच विदर्भात वीज निर्मिती होत असल्याने येथील उद्योगांना कमी दरात वीज पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. शासन विजेचे दर लगेच वाढविणार नाही. पण उद्योगांनीही नियमित वीजबील भरत हरित ऊर्जा आणि सौरऊर्जेकडे वळणे काळाची गरज बनली आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

विदर्भात मोठे उद्योग आणताना त्यासाठी ग्रोथ इंजिन ठरू शकणाऱ्या घटकांना चालना देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल. केवळ उद्योगच नाही तर येथे खाण प्रकल्प, पर्यटनवाढीवर भर देणे आवश्‍यक आहे. मोठ्या उद्योगांचा विचार करताना, त्याला पूरक विविध छोट्या उद्योगांचीही वाढ करावी लागणार आहे. विदर्भातील खाण व्यवसायाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात मोठा कारखाना उभारणीची घोषणा केली आहे. त्यामुळे ऍडव्हॉंटेज विदर्भासारखा इनक्रेडीबल विदर्भ उपक्रम विचाराधीन आहे. विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन तत्पर असून, उद्योगांना लागणारी वीज अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मात्र, त्यासोबतच उद्योजकांनी सौरऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करावी असेही राऊत म्हणाले. वस्त्रोद्योग निर्मिती उद्योजकांनी ऊर्जामंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government trying for new industries in Vidarbha