
पदविधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भारताय जनता पक्ष अशी थेट लढत झाली. प्रचारादरम्यानही कधी महाविकास आघाडी, तर कधी भाजप मागेपुढे होत राहिले.
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १ डिसेंबरला मतदान झाले. आज येथील मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी हे एकूण ७३३४ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे संदीप जोशी दुसऱ्या स्थानावर असून त्यांना १६ हजार ९५२ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपचा बालेकिल्ला ढासळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पदविधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भारताय जनता पक्ष अशी थेट लढत झाली. प्रचारादरम्यानही कधी महाविकास आघाडी, तर कधी भाजप मागेपुढे होत राहिले. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही नेमका अंदाज कुणाला लावता आलेला नव्हता. त्यामुळे पण गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने लढत अतिशय अटीतटीची झाली.
हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
त्यामुळे भाजपचा गढ यावेळी राखला जातो की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यामुळे मतदानानंतरही राजकीय जाणकार अंदाज लावायला कचरत होते. पहिल्याच फेरीत अभिजित वंजारींनी आघाडी घेतल्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत आनंद तर भाजपच्या गोटात चिंता दिसतेय.
आजवर भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासमोर विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले.
जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव
याशिवाय त्यांनी सुमारे दीड वर्षाआधीपासून या मतदारसंघात मशागत केली. यंदा बसपाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. असे असले तरी यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा थेट मुकाबला झाला. आता अभिजीत वंजारी पहिल्या फेरीत आघाडीवर असल्यामुळे भाजपच्या गढाला सुरूंग लागतो की काय? अशी चर्चा रंगली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ