esakal | पदवीधर निवडणूक : क्रमांक १ लिहिल्यावरच मतदान ठरणार वैध; पहिली पसंती आवश्यकच
sakal

बोलून बातमी शोधा

Graduate elections require preference voting

उमेदवाराच्या समोर पसंतीक्रमाची नोंद करण्यासाठी विशिष्ट पेन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी मतपत्रिका जवळपास निश्चित करण्यात आली असून यावर प्रथम क्रमांकावर कॉंग्रेसचे अभिजित वंजारी तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे संदीप जोशी आहेत.

पदवीधर निवडणूक : क्रमांक १ लिहिल्यावरच मतदान ठरणार वैध; पहिली पसंती आवश्यकच

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : नागपूर विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. यात पसंतीक्रमानुसार मतदान करायचे असल्याने इच्छुक उमेदवाराच्या समोर १ लिहिल्यावरच मतदान वैध ठरणार आहे.

निवडणुकीसाठी नागपूर विभागात दोन लाख सहा हजार ४५४ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात १९ उमेदवार रिंगणात आहेत. एक डिसेंबरला मतदान होणार असून, तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे मतदानासाठी ईव्हीएमचा उपयोग होणार नसून मतपत्रिकेवर मतदान करावे लागेल.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

मतदारास पसंतीक्रमानुसार मतदान करता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारास संपूर्ण १९ उमेदवारासही मतदान करता येईल. उमेदवारास समोर पसंती क्रमांकाची नोंद करावी लागेल. इच्छुक उमेदवाराच्या समोर १ लिहिणे आवश्यक आहे. १ क्रमांक न लिहिता उमेदवाराच्या समोर २ किंवा इतर पसंतीक्रम लिहिल्यास मतदान अवैध ठरणार आहे.

उमेदवाराच्या समोर पसंतीक्रमाची नोंद करण्यासाठी विशिष्ट पेन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी मतपत्रिका जवळपास निश्चित करण्यात आली असून यावर प्रथम क्रमांकावर कॉंग्रेसचे अभिजित वंजारी तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे संदीप जोशी आहेत.

अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

अशी असेल मतपत्रिकेवरील क्रमवारी

 • १ अभिजित वंजारी (कॉंग्रेस)
 • २ संदीप जोशी (भाजप)
 • ३ राजेंद्रकुमार चौधरी (रिपाइं खोब्रागडे)
 • ४ राहुल वानखडे (वंचित बहुजन आघाडी)
 • ५ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी)
 • ६ अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष)
 • ७ अमित मेश्राम (अपक्ष)
 • ८ प्रशांत डेकाटे (अपक्ष)
 • ९ नितीन रोंघे (अपक्ष)
 • १० नितेश कराळे (अपक्ष)
 • ११ प्रकाश रामटेके (अपक्ष)
 • १२ अजय तायवाडे (अपक्ष)
 • १३ ॲड. मोहमद शाकीर (अपक्ष)
 • १४ राजेंद्र भुतडा (अपक्ष)
 • १५ विनोद राऊत (अपक्ष)
 • १६ वीरेंद्र जयस्वाल (अपक्ष)
 • १७ शरद जिवतोडे (अपक्ष)
 • १८ संगीता बढे (अपक्ष)
 • १९ संजय नासरे (अपक्ष)

संपादन - नीलेश डाखोरे

go to top