शहरातील वाढत्या प्रकोपाला बळ मिळते; हे असू शकते कारण...

सतिश डहाट
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर प्रतिबंध लावण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात गर्दी टाळण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. कुठे गर्दी दिसल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मग, शिकवणी वर्ग प्रशासनाच्या नजरेत पडले नाही काय, असा प्रश्न या शिकवणी वर्गाच्या परिसरात राहणा-या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कामठी (जि.नागपूर): तालुक्यात दर दिवसाला बधितांचा आकडा फुगत असताना कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत आहे. कामठी तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पाचशेच्या पार गेली असून मागील बारा दिवसांपासून सतत एकामागे एक पंधरा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. दुसरीकडे सीबीएससी आणि राज्य बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. निकाल लागताच शहरात एखाद्या महाविद्यालयाप्रमाणे सुरू असणा-या शिकवणी वर्गाकडून पालकांना आकर्षित करण्यासाठी सध्या कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. अनेक शिकवणी वर्गात विद्यार्थी बसून शिकविण्याचा सपाटा सुरू केला असून शहरातील छुप्या शिकवणी वर्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सर्रास दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला मिळते बळ मिळत आहे.

अधिक वाचा  : नागपूर जिल्हयातील बेल्यामधील कारखान्यात ब्लास्ट, पाच ठार

जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर प्रतिबंध लावण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात गर्दी टाळण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. कुठे गर्दी दिसल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मग, शिकवणी वर्ग प्रशासनाच्या नजरेत पडले नाही काय, असा प्रश्न या शिकवणी वर्गाच्या परिसरात राहणा-या नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने नुकतेच कोरोना हवेतूनही पसरत असल्याचे जाहीर केले आहे. कामठी शहरासह ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असून पॉझिटिव्ह रूग्णांनी द्धिशतकाचा आकडा पार केलेला असून कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच शहरातील पूर्ण भाग या संसर्गाने वेढलेला आहे. यातच शिकवणींच्या नावावर अनेक विद्यार्थी ग्रामीण तसेच शहरातील विविध भागातून येतात. यामुळे शिकवणी वर्ग सुरू असलेल्या भागात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अधिक वाचा : नो टेंशन !ऍपद्वारे होणार आता अकरावीचे प्रवेश

सकाळी, सायंकाळी सुरू असते शिकवणी
शहरातील मेनरोड स्थित जुनी कामठी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील कामठी वाचनालय परिसरात, तिलकनगर मोंढा, नविन पोलिस स्टेशन परिसरातील येरखेडा रोड, रनाळा येथील पंकज मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूला, गणेश मंदीर परिसर अशा अनेक भागात शिकवणी वर्ग सुरू आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास हे शिकवणी वर्ग सुरू असतात. काही ठिकाणी तर हे शिकवणी वर्ग पहाटे पाच वाजेपासून तर काही ठिकाणी सायंकाळी सात वाजेनंतर सुरू असतात. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. या काळात परिसरातील नागरिक बाहेर फिरतात. तर चिमुकली मुलेही खेळत असतात. या वर्गामुळे शहरात व ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The growing outrage in the city is gaining momentum