दोन दारू उत्पादकांकडून १०८ कोटींची जीएसटी चोरी

gst evasion Rs 108 Crore Two Liquor Producers Revealed
gst evasion Rs 108 Crore Two Liquor Producers Revealed

नागपूर :  वस्तू व सेवाकर गुप्तचर महासंचालकाच्या (डीजीजीआय) चमूने औरंगाबाद आणि नांदेड येथील दोन दारू उत्पादकांवर छापे टाकून १०८ कोटींची जीएसटीची चोरी केल्याचे उघडकीस आणले आहे. 

वस्तू व सेवाकर विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर औरंगाबाद विभागीय कार्यालयाने २८ आणि २९ जुलैला नांदेड आणि औरंगाबाद येथील दोन दारू उत्पादकांवर कारवाई केली. दरम्यान, नांदेड येथील डिस्टलरीतर्फे माल्ट स्पिरिटचा पुरवठा करताना जीएसटीच्या नियमाच्या उल्लंघन करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. कागदपत्राची तपासणी केली असता जुलै २०१७ ते जून २०२० पर्यंत करदात्याने १२ कोटी ६१ लाखाची जीएसटी न देताच ७० काटी ०३ लाखाचा माल्ट स्पिरिटचा पुरवठा केला होता

करदात्याकडून मात्र अल्कोहोलच्या पुरवठ्यावर जीएसटी देत होते. मात्र, मोठ्या प्रमाणात अल्कोहोलवर जीएसटीबाबत कायदेशीर पूर्तता करण्यात आली नसल्याचे उघड झाले. या करदात्यांनी तीन वर्षाच्या कालावधीत मानवी सेवनासाठी उपयुक्त ४७६ कोटीच्या अल्कोहोलचा पुरवठा केला. मात्र, ८५ कोटी ६८ लाखाची जीएसटीची चोरी केली. यासोबतच सेनवेट क्रेडिट घेतले. सेनवेट क्रेडिट नियमानुसार पाच कोटी रुपये द्यायला हवा होता. या माध्यमातून करदात्याने १०८ कोटी रुपयाच्या जीएसटीची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील एका करदात्याने छापा टाकताच २ कोटी ५० लाख रुपयाचा जीएसटी जागेवर जमा केला. दुसऱ्या करदात्याने पुढील दोन महिन्यात ही रक्कम देण्याची हमी दिलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com