esakal | पतीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

बोलून बातमी शोधा

Harassment of a married woman by threatening to kill her husband Nagpur crime news

दोन डिसेंबर २०२० रोजी महिलेचा पती कामावर गेल्यानंतर आरोपी तिच्या घरी आला आणि शारीरिक संबंधाची मागणी केली.

पतीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पती व दोन मुलांना जिवानिशी ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रित विनायक येरपुडे असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय महिला पती व दोन मुलांसह यशोधरानगर वस्तीत राहते. त्याच वस्तीत आरोपी प्रित विनायक पेयपुडे (वय २४) हा राहतो. महिलेचा पती आणि आरोपी हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी खासगी नोकरी करतात. वस्तीत असल्यामुळे प्रितचे महिलेच्या घरी येणे-जाणे होते. तिच्या पतीशीही त्याची मैत्री होती.

दोन डिसेंबर २०२० रोजी महिलेचा पती कामावर गेल्यानंतर आरोपी तिच्या घरी आला आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने संबंधास नकार देताच पती व मुलांना ठार मारण्याची धमकी दिली आणि तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

त्यानंतर त्याने दोन फेब्रुवारी २०२१ पर्यंत तीन महिने तिला धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसाांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे.