esakal | आरोग्य विभागाचा पेपर परीक्षेआधीच फुटला; उमेदवारांची तक्रार, परीक्षा रद्द करण्याची मागणी

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागाचा पेपर परीक्षेआधीच फुटला; उमेदवारांची तक्रार, परीक्षा रद्द करण्याची मागणी}

नेक केंद्रांवर बैठक व्यवस्थेच्या अभावामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून एकाच बाकावर दोनपेक्षा अधिक उमेदवारांना बसविल्याचे निदर्शनास आले. याबाबत अनेक तक्रारी आल्याने ही परीक्षाच रद्द करावी अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

आरोग्य विभागाचा पेपर परीक्षेआधीच फुटला; उमेदवारांची तक्रार, परीक्षा रद्द करण्याची मागणी
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : आरोग्य विभागाद्वारे काढण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दुपारच्या सत्रातील पेपर फुटल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दुसरीकडे परीक्षेदरम्यान विभागाकडून केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावरही विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

आरोग्य विभागाद्वारे मानसशास्त्रज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, कनिष्ठ लिपिक, सामाजिक पर्यवेक्षक अशा साडेआठ हजार पदांसाठी रविवारी (ता. २८) राज्यातील विविध केंद्रांवर दोन सत्रात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. एकाच दिवशी सर्वच पदांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. विदर्भातील उमेदवारांना मुंबई, पुणे या शहरात तर जळगावच्या विद्यार्थ्यांना नागपूर, चंद्रपूर येथे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे उमेदवारांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला.

अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

सकाळच्या सत्रात पहिला तर दुपारच्या सत्रात दुसरा पेपर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नागपूर केंद्रावर दुसऱ्या सत्रातील पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याची तक्रार करण्यात आली. विशेष म्हणजे अनेक केंद्रांवर बैठक व्यवस्थेच्या अभावामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून एकाच बाकावर दोनपेक्षा अधिक उमेदवारांना बसविल्याचे निदर्शनास आले. याबाबत अनेक तक्रारी आल्याने ही परीक्षाच रद्द करावी अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. दरम्यान, काही उमेदवारांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

बंदचा उमेदवारांना फटका

कोरोनामुळे रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसला होता. नागपूर शहरात असलेल्या विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. मिनी लॉकडाउनमुळे उमेदवारांना उपाशी राहावे लागले.