चंद्रपुरात भडका, नागपूर @ 46.0

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

सोमवारी 47 अंशांवर गेलेला नागपूरचा पारा दोन दिवसांत एका अंशाने घसरून आज 46 अंशांवर आला. अकोल्याचा पाराही 47.4 वरून 44.6 अंशांवर आला.

नागपूर : विदर्भात नवतपाचा प्रभाव हळूहळू कमी होत असला तरी, उकाडा व उन्हाचे चटके कायम आहेत. चंद्रपूर येथे पाऱ्याने अचानक उसळी घेत विदर्भात बुधवारी उच्चांक गाठला. तर नागपूर व अकोल्याच्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशी अंशतः घसरण झाली. उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असून, शनिवारपासून पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या

सोमवारी 47 अंशांवर गेलेला नागपूरचा पारा दोन दिवसांत एका अंशाने घसरून आज 46 अंशांवर आला. अकोल्याचा पाराही 47.4 वरून 44.6 अंशांवर आला. चंद्रपुरात मात्र उन्हाचा भडका उडाला. काल वादळी पावसामुळे कमी झालेले तापमान चोवीस तासांत 1.2 अंशांनी वाढून 46.4 वर गेले. बुधवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात करण्यात आली.

बुलडाण्याचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्र लाट दिसून आली. उकाडा व उन्हामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाच नव्हे, रात्रीसुद्धा उन्हाच्या झळा जाणवतात. रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा असल्याने विदर्भातील उष्ण लाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाची दाट शक्‍यता आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heat wave continues in Vidarbha Nagpur @ @ 46.0