CoronaVirus : नागपुरात 'हाय अलर्ट', डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

बुधवारी कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पालिका आरोग्य विभागाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कोरोनाबाबत जनजागृतीसंदर्भात यापूर्वीच पाऊले उचलण्यात आली आहे. पालिकेचे तीन डॉक्‍टर नियंत्रण कक्षातून नियमित सेवा देणार असून सर्व डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे. विमानतळावर बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी पालिकेच्या सहा डॉक्‍टरांची एक चमू कार्यरत राहणार आहे.

नागपूर : शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकाही सतर्क झाली असून संशयित रुग्णांच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून विमानतळावर एक पथक तैनात राहणार असल्याचे नमुद करीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी भीती बाळगू नये, असे नागरिकांना आवाहन केले आहे. 

बुधवारी कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पालिका आरोग्य विभागाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कोरोनाबाबत जनजागृतीसंदर्भात यापूर्वीच पाऊले उचलण्यात आली आहे. पालिकेचे तीन डॉक्‍टर नियंत्रण कक्षातून नियमित सेवा देणार असून सर्व डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे. विमानतळावर बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी पालिकेच्या सहा डॉक्‍टरांची एक चमू कार्यरत राहणार आहे.

महापालिकेचे कंट्रोल रुम स्थापन
पालिका संशयित रुग्णाचे नमुणे घेणार नाही. मात्र, रुग्णासंदर्भात मेडिकलला माहिती पुरविणार आहे. यासाठी डॉक्‍टरांचे समन्वय पथकही तयार आहे. पालिकेच्या रुग्णालयांत सर्दी, खोकला, तापावरील औषधे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.

भयंकर! एकाने केला बलात्कार तर दुसऱ्यानेही सोडली नाही संधी..

...तर तो संशयित 
एखाद्याला ताप आला, त्यावर उपचारासाठी टॅबलेट दिली. परंतु त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसेल तर त्याला संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. विदेशातून आलेल्यांनी चौदा दिवसांपर्यंत घरीच राहावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले. 

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 
महापालिकेने 0712-2567021 हा आपत्कालीन क्रमांकही उपलब्ध करुन दिला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये 24 तास वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. कर्मचाऱ्यांनी स्वत:ही वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजर, पूर्णवेळ मास्क वापरावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले. 

पालिकेसह खाजगी कार्यक्रमही रद्द 
महापालिकेचा 'महापौर इनोव्हेशन अवॉर्ड'चे वितरण कार्यक्रम अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 मार्चला आयोजित करण्यात आला होता. याशिवाय महिला व बाल कल्याण विभागाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यता आला. महपालिकेसह शहरातील खाजगी कार्यक्रमही रद्द करण्यात आले. 

आर्थिक फटका 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या सुरेश भट सभागृहात आयोजित एक कार्यक्रम रद्द करण्यात आला. आयोजकांनी कार्यक्रम रद्दचे पत्र दिल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. सुरेश भट सभागृहात तीन तासांसाठी चाळीस हजारांवर भाडे महापालिकेला मिळते. आणखीही कार्यक्रम रद्द झाल्यास पालिकेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

नागपूरकरांसाठी हेल्पलाईन : 'कोरोना'ची लक्षणे आढळल्यास करा या क्रमांकावर फोन

दिव्याखाली अंधार ! 
महापालिका शहरातील नागरिकांची काळजी घेत आहे. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांची काळजी घेतली नसल्याचे चित्र आहे. बायोमेट्रिक प्रणालीनुसार हजेरी सुरू आहे. अनेकजण बोटाचे ठसे उमटत नसल्याने जिभेला बोट लावून बायोमेट्रिक मशीनमध्ये टाकतात. यातून धोका नाकारता येत नाही. 

आयुक्तांच्या जनता दरबाराचे काय? 
महापौर संदीप जोशी, सभापती वीरेद्र कुकरेजा यांनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महापालिकेत अजूनही आयुक्त तुकाराम मुंढे यांचा जनता दरबार सुरू आहे. त्यामुळे पालिकेत गर्दी होणार नाही काय? या गर्दीतून नागरिकांनाही कोरोनाची भीती नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 
 

शहरामध्ये कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रुग्णावर उपचार सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. वेळोवेळी हात धुवा, गर्दीत जाणे टाळा, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असे लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. 
- संदीप जोशी, महापौर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high alert in nagpur corona virus