भावाला पोलिसांनी चोप दिला म्हणून `त्याने’ पोलिसावरच उगारला सूड, काय घडले ते वाचा...

सतिश घारड
Thursday, 17 September 2020

सोमवारी रात्री सिहोरा घाटातून वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही केली होती. तसेच गुन्ह्याची पार्श्‍वभूमी असलेल्या इसमाच्या भावाला पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या संशयात ठाण्यात आणून चोप दिल्याप्रकरणी आरोपीने पोलिस शिपायावर हल्ला केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 

टेकाडी (जि.नागपूर) :सोमवारी रात्री सिहोरा घाटातून वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही केली होती. तसेच गुन्ह्याची पार्श्‍वभूमी असलेल्या इसमाच्या भावाला पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या संशयात ठाण्यात आणून चोप दिल्याप्रकरणी आरोपीने थेट पोलिस शिपायावर हल्ला केला.

अधिक वाचाः या अशा काळात, रोग म्हणे, कपाशीला ‘मर’!, काय आहे प्रकार....
 

वाळूचोरांना पोलिसांना दाखविला हिसका
कन्हान पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायावर तारसा रोड गहूहिवरा चौक येथे धारधार चाकूने प्राणघातक हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमाराला घडली. हल्ल्यातील जखमी रवी चौधरी (वय४४,खसाडा)
असे पोलिस शिपायाचे नाव आहे. जखमी पोलिसाची स्थिती गंभीर असून त्याला तात्काळ नागपूर स्थित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री सिहोरा घाटातून वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही केली होती. तसेच गुन्ह्याची पार्श्‍वभूमी असलेल्या इसमाच्या भावाला पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या संशयात ठाण्यात आणून चोप दिल्याप्रकरणी आरोपीने पोलिस शिपायावर हल्ला केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अधिक वाचाःखबरदार ! येथे मृतदेह जाळता येणार नाही, कारण सांगितले असे...

असामाजिक तत्वांनी काढले डोके वर
कन्हान शहरात बुधवारी पोलिसावर झालेल्या हल्ल्याने शहरात पुन्हा एकदा गुंडप्रवृत्तीने डोके वर काढल्याचे चित्र समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सिहोरा घाटातून अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या वाहनावर कार्यवाही केली होती. सोबतच हवालदार रवी चौधरी यांनी गेल्या काही दिवसांआधी अवैध व्यवसायात लिप्त असलेल्या इसमाच्या भावाला  संशयावरून ठाण्यात आणून चोप दिला होता. त्याचाच राग मनात धरून अज्ञात मारेकऱ्यांनी बुधवारी रवी याला मारण्याचे नियोजन आखले आणि तारसा रोड गहू हिवरा चौकात रात्री ९ च्या सुमारास धारधार चाकूने त्याच्यावर हल्ला चढवून घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत पोलिसांनी रवी याला कामठी स्थित आशा रुग्णालयात नेले. परंतू प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ नागपूरला हलविण्यात आले. बातमी लिहिस्तोवर अज्ञात मारेकरी पोलिसांच्या अटकेबाहेर असून हल्ल्याचे मुख्य कारण स्पष्ट नव्हते.

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As his brother was beaten by the police, he took revenge on the police