गृहमंत्र्याचा मंत्र, आता विकासकामाला लागूया ! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

सोमवारी (ता. 13) सकाळी 9.30च्या सुमारास अमरावती दौऱ्याप्रसंगी काटोल विधानसभा मतदारसंघातील कोंढाळी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कोंढाळी-वर्धा टी पॉइंटवर ढोलताशे व फटाक्‍यांच्या आतषबाजीत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

कोंढाळी (जि.नागपूर) :   सत्कार झाला. आता विकासात्मक कार्याला लागू या, असे आवाहन करताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले व कोंढाळीतून पाय काढत अमरावतीकडे प्रस्थान केले. कार्यकर्त्यांसाठी हा त्यांनी कानमंत्रच दिला. 

क्‍लिक करा :   जीम ट्रेनरचा वैमनस्यातून काढला काटा 

गृहमंत्री देशमुख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 
सोमवारी (ता. 13) सकाळी 9.30च्या सुमारास अमरावती दौऱ्याप्रसंगी काटोल विधानसभा मतदारसंघातील कोंढाळी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कोंढाळी-वर्धा टी पॉइंटवर ढोलताशे व फटाक्‍यांच्या आतषबाजीत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अमरावती दौऱ्या दरम्यान दहा मिनिटांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी छोटेखानी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले व आता सत्कार झाला. यापुढे विकासात्मक कामाला लागू या, असे आवाहन केले. 

क्‍लिक करा  :  वाहरे व्वा ! दिव्यांग आहेत, प्रमाणपत्र नाही 

पुरातन गणपती मंदिराला गृहमंत्र्यांची भेट 
येथील 350 वर्षे जुने गणपती मंदिर असून आज तिळी चतुर्थीचा योग साधून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी 9 वाजता बाजारगाव मंदिर येथे येऊन गणपतीची पूजा व आरती केली. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे, जिल्हा परिषद सदस्य, नव्याने निवडून आलेल्या जि. प. सदस्य भारती पाटील, पं. स. सदस्य अविनाश पारधी, सोनेगाव निपाणी येथील पं. स. सदस्य रेखा वरठी, बाजारगाव येथील सरपंच तुषार चौधरी, उपसरपंच प्रकाश भोले, समाजसेवक राजू पारधी, भीमराव कडू, अनिल पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister's mantra, now apply to development work!