जीम ट्रेनरचा काढला वैमनस्यातून काटा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

अंगद पळून जात असताना आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अंगदला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना पाटणसावंगी परिसरात त्याचा मृत्यू झाला.

सावनेर (जि.नागपूर) :  जुन्या वादाचा राग ठेवून एका जीम ट्रेनरने दुसऱ्याचा खून केल्याची घटना शहरातील नाग मंदिराशेजारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दोघेही शहरातील वेगवेगळ्या जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करायचे. नरेंद्र सिंग असे आरोपीचे तर अंगद सिंग मृत ट्रेनरचे नाव आहे. अंगद मंत्री सुनील केदार यांचा खासगी अंगरक्षक म्हणूनही काम करायचा, अशी माहिती आहे. 

क्‍लिक करा : कानात आवाज येतोय, तोलही जातो, सावधान ! 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुजरखेडी परिसरातील नाग मंदिराजवळ एका आरोपीने सत्तुरने हल्ला करून अंगद सिंग याला गंभीर जखमी केले. अंगद पळून जात असताना आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अंगदला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना पाटणसावंगी परिसरात त्याचा मृत्यू झाला.

क्‍लिक करा:  लाचीच कढी नि बोलाचाच भात 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून आरोपीचा शोध सुरू केला. यामागचे कारण सदया उघड झाले नाही. जि.प. व पं.सच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यावरून राग ठेवून वैमनस्यातून काटा काढला नसावा, असा तर यामागे काही जुना राग असावा, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jim Trainor Removed Thorn From Evil