अरे जरा ऐकारे ! होमक्‍वारंटाइन केलेल्यांनी उडविली प्रशासनाची झोप, मग प्रशासनाने केला उपाय...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

शनिवारी नवीन कामठी भागातील लुंबिनीनगरात 24 वर्षीय रुग्ण होमक्‍वारंटाइन असतानासुद्धा घराबाहेर फिरत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षात येताच प्रशासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करणे सुरू केले आहे. सध्या तालुक्‍याच्या ग्रामीण भागात 294 व शहरात 186 लोकांना होमक्‍वारंटाइन करण्यात आले आहे.

कामठी/खापरखेडा (जि.नागपूर) :कामठी तालुक्‍यात पुणे, मुंबईसह परराज्यातून 480 लोकांना आतापर्यंत प्रशासनाकडून होमक्‍वारंटाइन करण्यात आले असून, हे लोक घरून बाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी आज रविवारी (ता. 24) सायंकाळी लुंबिनीनगर येथील कंटेटमेंट झोन भागाला भेट देऊन परिस्थिताचा आढावा घेतला.

घरी न ठेवता नजिकच्या शाळेत हलविले
शनिवारी नवीन कामठी भागातील लुंबिनीनगरात 24 वर्षीय रुग्ण होमक्‍वारंटाइन असतानासुद्धा घराबाहेर फिरत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षात येताच प्रशासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करणे सुरू केले आहे. सध्या तालुक्‍याच्या ग्रामीण भागात 294 व शहरात 186 लोकांना होमक्‍वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, हे नागरिक घराबाहेर पडत असल्याचे 23 तारखेला मिळालेल्या पॉझिटिव्ह रुग्णावरून दिसून आल्याने आता प्रशासन याची खबरदारी म्हणून त्यांना घरी न ठेवता, नजीकच्या शाळेमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात आज शहराला लागून असलेल्या येरखेडा व रनाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन पाहणी केली. येथील शनिवारी मिळालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील 7 लोकांसह बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले सात असे एकूण 14 लोकांना क्‍वारंटाइन करण्यात आले. त्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

हेही वाचा : पानठेला सांभाळून चालवायची "ती'अख्खा संसाराचा गाडा, मग का उचलले तिने असे पाउल...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
नवीन कामठी परिसरातील लुंबिनीनगरात 24 वर्षांचा तरुण कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने लुंबिनीनगर परिसर सील करण्यात आला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लुंबिनीनगरातील प्रतिबंध क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने गंभीर दखल घेत, या तरुणांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची यादी तयार करून त्यांना मेयो हॉस्पिटल नागपूर येथे आरोग्य तपासणीकरिता पाठवण्यात येणार आहे.

हेही वाचाः बापरे !चक्‍क पित्याने केला पेट्रोल टाकून मुलाला संपविण्याचा प्रयत्न, कारण होते...

खापरखेडयात आणखी तिघे रूग्ण आढळले
खापरखेडा (जि.नागपूर): परिसरातील दहेगाव रंगारी येथे शनिवारी एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. रविवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांमधून पुन्हा तीन जण आढळून आले. एकीकडे नागपूर जिल्ह्यातील शहरी भागात संसर्ग झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता ग्रामीण भागातही कोरोना आजाराने हातपाय पसरविले. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातसुद्धा धोक्‍याचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. "घरात राहा, सुरक्षित राहा' असे शासन प्रशासन वारंवार सांगत आहे.

हेही वाचा : तो निघाला कोरोना सर्वेक्षणाला आणि दारातच गाठले मृत्यूने !उन्हाचा तडाखा, कामाचा ताण की...

मित्रांसोबत दारू पिण्यासाठी फिरत होता बिनधास्त
दहेगाव रंगारी येथे पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा मुंबईवरून एका ट्रकने आला होता. मूळ गावी दहेगाव रंगारी येथे घरी ज्यादिवशी आला असताना घरात त्याला त्याच्या परिवारातील सदस्यांनी प्रवेश नाकारला. त्याला दवाखान्यातून तपासणी करून येण्याचा सल्ला दिला होता. तो नंतर अनेक मित्रांच्या संपर्कात आला. दरम्यान, परिसरात मित्रांसोबत दारू पिण्यासाठी तो बिनधास्त फिरत होता. त्याला होमक्‍वारंटाइन ठेवले असतानाही त्याने पाळले नसल्यामुळे अनेकांचा संपर्क आला. आज त्याच्या
संपर्कात येणारे तिघे मित्र शोधमोहिमेत आढळून आले. त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात आणून दोघा जणांना आधी 108 ऍम्बुलन्स बोलावून नागपूर येथील रुग्णालयात चाचणीकरिता पाठविण्यात आले. तर तिसरा दुपारनंतर कामावरून आल्यावर त्यालासुद्धा नागपूर येथे रुग्णालयात पाठविण्यात आले. संपर्कातील व काही मुंबई, पुण्यावरून येणाऱ्यांना शनिवारी, रविवारी 3 जणांना क्‍वारंटाइनकरिता पाठविले. गावातील एकूण 21 जणांना क्‍वारंटाइन केले असल्याची माहिती बातमी लिहिस्तोवर सूत्रांकडून प्राप्त झाली.

शोधमोहिम राबवित आहे
गावात कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू केली असून, वेळोवेळी शासनाला तशी माहिती ताबडतोब देत आहे.
-प्रकाश गजभिये
सरपंच, दहेगाव रंगारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HomeQuarantees blow up administration's sleep