आता महिन्यातून एकदा रुग्णालय व्हिजिट मस्ट...लवकरच निघणार अध्यादेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

आपल्या देशात कोट्यवधी रुपये खर्च करून स्मारके बांधली गेली आहेत, अजूनही बांधली जात आहेत. पण, हा पैसा जेथे गरज आहे, तेथे खर्च झाला पाहिजे. रुग्णालयांनाच स्मारक घोषित करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा,

नागपूर : लोकांनी मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च आदींमध्ये जावे. मात्र, रुग्णालयांमध्येही गेले पाहिजे. तेव्हाच कळेल की आपली खरी गरज कुठे आहे. जेथे, तुमची गरज आहे. तेथे तुम्ही पोचले पाहिजे. समाजातले दुःख वेचले पाहिजे. ही सवय विद्यार्थ्यांना लागावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी महिन्यातून एकदा रुग्णालयात भेट देण्याचा अध्यादेश काढणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू आज येथील वसंतराव देशपांडे सभागृहात दिली.

सविस्तर वाचा - बचतगटाच्या बेजबाबदारपणाला लगाम घालण्यासाठी करणार हे...
बच्चू कडू म्हणाले, आपल्या देशात कोट्यवधी रुपये खर्च करून स्मारके बांधली गेली आहेत, अजूनही बांधली जात आहेत. पण, हा पैसा जेथे गरज आहे, तेथे खर्च झाला पाहिजे. रुग्णालयांनाच स्मारक घोषित करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा, असा परखड सल्ला त्यांनी दिला. एक हृदयद्रावक घटना सांगताना ते म्हणाले, "दगड फोडणाऱ्या कुटुंबातील एका महिलेची रुग्णालयात प्रसूती झाली. नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. तिचा नवरा, कुटुंबातील सदस्य व नातेवाइकांनी खूप प्रयत्न केले. पण, पाच हजार रुपयांची व्यवस्था करू शकले नाही. परिणामी बाळ दगावले आणि तिसऱ्या दिवशी त्या महिलेने बेडच्या वर असलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पाच हजार रुपयांसाठी दोन जीव गेले. देशातील स्मारकांना नव्हे तर, रुग्णालयांना पैशांची आवश्‍यकता आहे. हे जर आपण करू शकलो, तर एक चांगला देश उभा राहू शकतो असेही ते म्हणाले.

अकोल्यात देशी कट्टा आला कुठून ?
राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यावर गोळ्या झाडणे आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची हत्या सुपारी किलिंगचा प्रकार आहे. अकोल्यात यापूर्वीही पाच वेळा अशा गावठी बंदुकींचा वापर झालेला आहे. त्यामुळे देशी कट्टा अकोल्यात आला कसा, येथून तपासाची सुरुवात होईल आणि चार-पाच दिवसांत आरोपी गजाआड होतील, असा विश्‍वास शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospital visit must for students