आयुक्त मुंढेंनी ६६ अभियंत्यांना कसा दिला दणका ? वाचा

How did Commissioner Mundhe hit 66 engineers?
How did Commissioner Mundhe hit 66 engineers?

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, अभियांत्रिकी सहायकांना आयुक्तांना जोरदार दणका दिला. आयुक्तांनी ६६ जणांच्या विविध विभागात बदल्या केल्या. एवढेच नव्हे बदल्या रोखण्यासाठी राजकीय दबावाची शक्यता लक्षात घेता बदली रोखण्यासाठी दडपण आणल्यास कारवाईचा इशारा दिला. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या प्रथमच करण्यात आल्या आहेत.

एकाच विभागात अनेक वर्षे काम केल्याने कामाची गती मंदावली असल्याचा निष्कर्ष आयुक्तांनी रुजू झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच काढला होता. त्यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणात बदल्याचे संकेत मिळाले होते. नुकताच त्यांनी महापालिकेच्या कर विभागाची पुनर्रचना केली.

आता त्यांनी स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि अभियांत्रिकी सहायकांच्या बदल्या केल्या. या बदल्यांमध्ये धरमपेठ झोनचे उपअभियंता पी. एम. आगरकर यांच्याकडून पदभार काढून घेत उपअभियंता अनिल गेडाम यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच गेडाम धरमपेठ झोनच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरीक्त् कार्यभारही पाहतील.

उपअभियंता रवींद्र बुधाडे यांच्याकडील गांधीबाग झोनचा कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार काढून नेहरूनगर झोनचे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढूलकर यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले. उपअभियंता एस. आर. गजभिये याच्याकडील कार्यकारी अभियंता पदाचा पदभार काढून तो धंतोली झोनचे उपअभियंता यु. व्ही. धनविजय यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

या बदल्यांमध्ये २१ कनिष्ठ अभियंत्यांचीही अंतर्गत विभागनिहाय बदल्या करण्यात आल्या. अनेक वर्ष झोन व एकाच विभागात कार्यरत असलेल्या अनेकांना वेगळया ठिकाणी हलविण्यात आले आहे. यासोबतच ३३ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या करण्यात आलेल्यांना हा कार्यमुक्तीचा आदेश असल्याचेही बजावत तत्काळ बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याच निर्देश दिले. आदेशाप्रमाणे रूजू न झाल्यास तसेच आदेश रद्द व बदल करण्यासाठी कोणता दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंग समजून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

सत्ताधाऱ्यांवर आयुक्तांची कुरघोडी
महापालिकेत कुठला अधिकारी कुठे बसवावा, याबाबत सत्ताधाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असतोच. प्रशासनाने एखाद्याची बदली केल्यास ते रोखण्यासाठी प्रयत्नच होत नाही तर ती रोखलीही जाते. बदली करायची असल्यास सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचीही संमती घेतली जाते. मात्र यावेळी आयुक्तांनी एकाचवेळी ६६ जणांच्या बदल्या केल्या. सत्ताधाऱ्यांवर आयुक्तांची ही कुरघोडी असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com