सांगा, कसा होणार नाही उद्रेक? खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी आलेले संशयित फिरतात संपूर्ण परिसरात.. 

केवल जीवनतारे 
Monday, 3 August 2020

उपराजधानीत एकमेव खासगी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची चाचणी होते. यामुळे नागपुरातील शेकडो मध्यमवर्गीयांची एकाच खासगी लॅबवर चाचणीसाठी गर्दी होत आहे.

नागपूर:  नागपुरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. दररोज कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळून येत आहे. पण नागपूकरांना आता कोरोनाची भीती राहिली नाही का असा सवाल उपस्थित होतोय. त्यात सोशल डिस्टंसिंगचे  धाब्यावर बसवून कोरोना संशयितांची तोबा गर्दी खासगी लॅबच्या बाहेर बघायला मिळत आहे.   

उपराजधानीत एकमेव खासगी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची चाचणी होते. यामुळे नागपुरातील शेकडो मध्यमवर्गीयांची एकाच खासगी लॅबवर चाचणीसाठी गर्दी होत आहे. वशेष असे की, कोरोनाचा प्रकोप दूर ठेवायचा असेल तर सार्वजनिक जीवनात सामाजिक आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला प्रशासनाकडून दिला जातो. मात्र याला कोरोना संशयितांकडूनच हरताळ फासला जात असल्याचे चित्र येथे दिसून येते.

सविस्तर वाचा - आईने विरोध केल्याने ती झाली प्रियकरापासून दूर, त्याने लग्न करताच घर गाठत म्हणाली बायकोला हाकलून दे...

बेजबाबदार वर्तवणूक 

कोरोनाचा नागपुरात शिरकाव झाल्यानंतर मेयो, मेडिकलशिवाय श्रीमंत, मध्यमवर्गीयापासून तर गरीबांना चाचणीचा दुसरा पर्याय नव्हता. मात्र रामदासपेठेत एका खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करण्यास परवानगी मिळाली आणि मध्यमवर्गीयांची या खासगी प्रयोगशाळेसमोर गर्दी होऊ लागली. जिल्हा प्रशासनाने सामाजिक अंतर पाळा आणि कोरोनाला दूर ठेवा असे ओरडून ओरडून सांगितले, मात्र कोरोना संशयित एकून घेण्याच्या तयारीत नाही. बेजबादारपणे येथे सारी संशियत नागरिक वागत आहेत.

कसा थांबणार प्रादुर्भाव 

यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. विशेष असे की, मागील पंधरा दिवसांपासून खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्या वाढत आहे. एक हजाराजवळपास या प्रयोगशाळेत चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांमुळे नागपुरात कोरोना वाढत आहे, अशी चर्चा पसरली आहे.

महापालिकेने घ्यावा पुढाकार

कोरोना विषाणू निदानाच्या सुविधा वाढल्या आहेत. कोरोनाबाधितींची संख्या वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत घशातील स्त्राव नमुन्याचा अहवाल येण्याचा कालावधी देखील सात तासांवरून अवघ्या एक तासावर आला आहे. अँटिजेन रॅपिड चाचणीमुळे हे शक्य झाले. भारतीय वैद्यकीय चिकित्सा परिषदेच्या दिशादर्शक सुचनांमुळे खासगीतील प्रयोगशाळांनाही कोरोना दानाची परवानगी देण्यात आली आहे.

क्लिक करा - युवती ब्युटीपार्लरमध्ये चेहऱ्याच्या मसाजसाठी जायची; महिला नेहमी कशाचे तरी पाणी पिण्यासाठी देत पैशांसाठी करायची ब्लॅकमेल, वाचा...

मात्र रामदासपेठेतील प्रयोगशाळेसमोर एक सुरक्षा रक्षक तैनात असतो. संशयितांना बाजुला करण्याचा प्रयत्न करतो, परंतु व्यर्थ ठरते. संशयित रुग्णाच्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत याच परिसरात ते फिरत असतात. त्यामुळे कोरोनाबाधित आलेल्यांचा मोठा धोका आहे. महापालिका आरोग्य विभागाने या खासगी प्रयोगशाळेसमोरच्या बेजबाबदार नागिरकांना तसेच खासगी प्रयोगशाळा संचालकांना तशी समज द्यावी अशी मागणी काही नागरिक करत आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge crowd recorded at private corona testing lab in nagpur