esakal | आईने विरोध केल्याने ती झाली प्रियकरापासून दूर, त्याने लग्न करताच घर गाठत म्हणाली बायकोला हाकलून दे...
sakal

बोलून बातमी शोधा

The lover killed his beloved in yavatmal

दारव्हा तालुक्‍यातील तिवसा येथील तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते, अशी माहितीही पोलिसांना दिली. शीला यांनी तरुणाविरुद्ध संशय व्यक्त केला. यामुळे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. 

आईने विरोध केल्याने ती झाली प्रियकरापासून दूर, त्याने लग्न करताच घर गाठत म्हणाली बायकोला हाकलून दे...

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : लाडखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वारज शिवारातील एका विहिरीत काही दिवसांपूर्वी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. काही नागरिकांना हा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला होता. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता खुनामागील हे सत्य पुढे आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी युवतीची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू असताना हरविलेल्या व्यक्तींच्या बाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात शीला मोरे (रा. देवीनगर) या महिलेने आपली मुलगी हरविल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिल्याचे समोर आले. संशयातूनच पोलिसांनी शीला मोरे यांना मृत युवतीच्या अंगावरील वस्तू आणि फोटो दाखविले. शीला यांनी ही मुलगी आपली असल्याचे सांगितले. तसेच तिचे नाव काजल असल्याचे सांगितले.

जाणून घ्या - आयुक्त मुंढे व लोकप्रतिनिधी वादावर काय म्हणाले फडणवीस? वाचा

तिचे दारव्हा तालुक्‍यातील तिवसा येथील तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते, अशी माहितीही पोलिसांना दिली. शीला यांनी तरुणाविरुद्ध संशय व्यक्त केला. यामुळे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. 

‘माझ्याशी लग्न कर, बायकोला हाकलून दे'

काजल मोरे (वय १८, रा. लोहारा) हिला प्रियकर गजानन कैलास सुदगुते (वय २२, रा. तिवसा) याचा विवाह झाल्याची माहिती मिळाली. यामुळे ती चिडली. काजलने गजाननचे घर गाठून "माझ्याशी लग्न कर, बायकोला हाकलून दे' असा तगादा लावला. त्यामुळे गजानने प्रेयसीला शेतशिवारात नेऊन विहिरीत ढकलून देत खून केला. लग्नाच्या एक महिन्यातच प्रियकराच्या हातात बेड्या पडल्या.

क्लिक करा - “सानिका तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे” थेट विधान भवनातून आला फोन आणि तिला बसला आश्चर्याचा धक्का...

आईचा लग्नाचा विरोध

जल व गजानन यांच्यात एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. लग्नाला काजलच्या आईचा विरोध होता. त्यामुळे तरुणाच्या वडिलांनी सहा जून रोजी आर्णी येथील एका मुलीशी लग्न लावून दिले. दरम्यान तीन जुलैला काजल यवतमाळ येथून तिवसा येथे आली आणि लग्नाचा तगादा लावल्याने विहिरीत ढकलून तिला संपविले. 

संपादन - नीलेश डाखोरे