esakal | Breaking : विक्को कंपनीत आंगीचे तांडव; आग काही आटोक्यात आलेली नाही

बोलून बातमी शोधा

A huge fire broke out at the famous Vico company in Nagpur}

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Breaking : विक्को कंपनीत आंगीचे तांडव; आग काही आटोक्यात आलेली नाही
sakal_logo
By
सोपान बेताल

नागपूर : हिंगणा एमआयडीसीमधील सुप्रसिद्ध विको कंपनीला रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताचा अग्निशमन दलाच्या गाड्या कंपनीत दाखल झाल्या होत्या. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आले नाही. आगीने हळुहळू पूर्ण कंपनीला आपल्या कवेत घेतले. गोडाऊन, पोडक्शन, डिपार्टमेंट ऑफिस यात यांचा समावेश आहे. सकाळी कर्मचारी कंपनीत आले असता पूर्ण कंपनी आगीने व्यापली होती.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आगीची लोट आणि धुराचा लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात एकच तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिस पथक आणि आरोग्य सेवेत दाखल झाले आहे.

अधिक माहितीसाठी - ‘आई तुझ्याशी शेवटचे बोलायचे... मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तुझा आवाज मला ऐकायचा आहे...’

सोमवारी सकाळी कामगार कंपनीच्या गेटवर आले असता रडत घराकडे वापस गेले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, आगीला आटोक्यात करण्यासाठी नागपूर महानगरपालिका, डिफेन्स, वाडी, एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग काही आटोक्यात आलेली नाही. कंपनीचे नवीन बाधकामाची सेंट्रिंग जळाल्याने स्लाप सुध्दा कोसळला आहे. या आगीमुळे हजारो कामगाराचा रोजगार गेला. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आगीत जळाली आहे.