पत्नीनं दुसरं लग्न करण्याची दिली धमकी अन् संतापलेल्या पतीनं चाकूनं केले सपासप वार; घडला थरार  

अनिल कांबळे 
Monday, 22 February 2021

ईशिका विलास उईके (वय २० रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी),असे जखमीचे नाव आहे. बजाजनगर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर पतीला अटक केली.

नागपूर ः ‘तू माझा शारीरिक व मानसिक छळ करतो. आता मी दुसरे लग्न करेल’, अशी धमकी दिल्याने संतप्त झालेल्या पतीने चाकूने वार करून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना लक्ष्मीनगर चौकात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. 

ईशिका विलास उईके (वय २० रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी),असे जखमीचे नाव आहे. बजाजनगर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर पतीला अटक केली. सूर्यकांत दुरसिंग शाहू (वय ३० रा. राजीवनगर, एमआयडीसी), असे अटकेतील पतीचे नाव आहे. सूर्यकांत हा गणशपेठेतील हॉटेल राहुलमध्ये वेटर आहे.

हेही वाचा - सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं उचललं टोकाचं...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सूर्यकांत याने ईशिकासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर तो ईशिकाचा शारीरिक व मानसिक छळ करायला लागला. सहा महिन्यांपूर्वी ईशिका माहेरी आली. ती लक्ष्मीनगर परिसरातील गौरी वृंदावन पावभाजी सेंटर काम करायला लागली. रविवारी सूर्यकांत याने ईशिकाच्या मोबाइलवर संपर्क साधला. दोघांमध्ये वाद झाला. तू माझा छळ करतो ,मी दुसरे लग्न करेल,असे ईशिका त्याला म्हणाली. सूर्यकांत संतापला.

रात्री काम आटोपून ईशिका ही मैत्रिणीसह पायी घरी जात होती. लक्ष्मीनगर भागात सूर्यकांत याने ईशिकाला गाठले. तिच्यावर चाकूने सपासप वार केले. ईशिकाच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेतली. सूर्यकांत याला पकडले. त्याला चोप दिला. बजाजनगर पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा - Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७...

माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी सूर्यकांत याला अटक केली. जखमी ईशिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सूर्यकांत याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Attacked on wife in Nagpur Laxminagar