esakal | बापाने अवघ्या दोन वर्षांच्या मुलावर केला चाकूने हल्ला; पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय
sakal

बोलून बातमी शोधा

husband doubt on wife and attack child

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विकास हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर चंद्रपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी कोराडीतील ठाकरे ले-आऊटमध्ये राहणाऱ्या आशिका (२४) यांचा त्याच्यासोबत विवाह झाला.

बापाने अवघ्या दोन वर्षांच्या मुलावर केला चाकूने हल्ला; पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर :   पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीवर विटेने हल्ला केला. त्यानंतर दोन वर्षाच्या मुलावर चाकूने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विकास नरसिंग खोटे (३०, रा. चंद्रपूर) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विकास हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर चंद्रपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी कोराडीतील ठाकरे ले-आऊटमध्ये राहणाऱ्या आशिका (२४) यांचा त्याच्यासोबत विवाह झाला. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे घरात नेहमी वाद होत होते. तसेच तो आशिका हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. 

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

कधीतरी पती सुधारणार या आशेवर असलेली आशिका या पतीचा अत्याचार सहन करीत होत्या. त्यांना दोन वर्षाचा अयान नावाचा मुलगा आहे. सुरळीत संसार सुरू असताना विकास पुन्हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. तिला मारझोड करीत होता.

पतीच्या त्रासाला कंटाळून आशिका यांनी काही दिवसांपूर्वी पतीचे घर सोडले आणि माहेरी नागपुरात आली. शुक्रवारी रात्री आठ वाजता विकास हा पत्नीच्या आईच्या घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करीत घराबाहेर बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता घरावर दगडफेक केली. त्यामुळे ती घराबाहेर आली. त्याने पत्नीशी वाद घालत तिच्या डोक्यावर वीट फेकून मारली. त्यामुळे तिचे डोके फुटले. 

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

त्यानंतर बाजूला असलेल्या मुलाला कडेवर घेतले. त्याच्या मांडीवर चाकूने हल्ला करीत जखमी केले. घाबरलेल्या आशिकाने थेट पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. पोलिस येण्यापूर्वीच विकासने तेथून पळ काढला. या प्रकरणी आशिकाच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी विकासविरुद्ध गुन्हा दाखल केला. विकास फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top