esakal | VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक
sakal

बोलून बातमी शोधा

if one person passes away then another one surely pass away in this village

या अभद्र योगायोगमुळे गावात एखाद्याला मरण आले तर आता दुसरा कोण ? याची चर्चा सूरू होते.वृध्द,आजारी व्यक्तींची धाकधूक वाढत असते.चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या धाबा गावात हा विचित्र योगायोग बघायला मिळत आहे.मृत्यूचा या अभद्र योगायोगाची चर्चा अधूनमधून गावात घडत असते..

VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक

sakal_logo
By
निलेश झाडे

धाबा ( जि. चंद्रपूर) : एका गावात मृत्यूचा अभद्र योगायोग सूरू आहे. गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एखाद्या  व्यक्तीला आठवडाभरात मरण निश्चित येते. हा योगायोग पाच,दहा वर्षाचा नाही. शेकडो वर्षापासून हा विचित्र योगायोग सूरू आहे. यामागे कुठली दैवी शक्ती नाही..श्रध्दा नाही की अंधश्रध्दा नाही.हा केवळ योगायोग. या अभद्र योगायोगमुळे गावात एखाद्याला मरण आले तर आता दुसरा कोण ? याची चर्चा सूरू होते.वृध्द,आजारी व्यक्तींची धाकधूक वाढत असते.चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या धाबा गावात हा विचित्र योगायोग बघायला मिळत आहे.मृत्यूचा या अभद्र योगायोगाची चर्चा अधूनमधून गावात घडत असते..

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या जिवाचा मृत्यू ठरलेलाच.टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मृत्यूला टाळता येणे अशक्यच.संत, महात्म्यांनी मृत्यूला अंतिम सत्य मानले आहे. अश्यात मृत्यूचा अभद्र योगायोगाची चर्चा एका गावात सूरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा हे प्राचीन गाव.गावात अनेक मंदीरे आहेत.

संत परमहंस कोंडय्या महाराज यांची समाधी गावात आहे.संताचा स्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. मात्र या गावात एक विचित्र योगायोग अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे. गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की आठवडाभरात दूसर्या व्यक्तीचा मृत्यू होतो. हा योगायोग मागिल शेकडो वर्षापासून सूरू आहे.त्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर आता कुणाचा नंबर याची उत्सूकता आणि भिती गावाला लागून असते.या विचित्र योगायोगात अद्यापही खंड पडलेला नसल्याचे वृध्द सांगतात.

आज मी वयाची सत्तरी गाठली.मला सूदबुद आली तेव्हापासून मी बघत आहे.गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर आठवडाभरात,फार तर पंधरा दिवसात गावातील दूसर्याला व्यक्तीचा मृत्यू होतो. हे विचित्र आहे.
देवाजी चापले ,
नागरिक धाबा

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

धाबा हे परिसरातील प्राचीन गाव आहे.गावात एक असा योगायोग पाहायला मिळतो.कुठल्याही कारणांनी गावात एखाद्याचे निधन झाले तर लगेच आठ पंधरा दिवसात दुसऱ्या व्यक्तीचे निधन होते.हा योगायोग वारंवार गावात घडत असतो.
किशोर अगस्ती,
धाबा

संपादन - अथर्व महांकाळ