खुशखबर! गोरेवाड्यात आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, येत्या जानेवारीत उदघाटन

inauguration of gorewada international zoo park will held in January
inauguration of gorewada international zoo park will held in January

नागपूर : गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी एका कार्यक्रमात दिले. पहिल्या टप्प्यात इंडियन सफारीअंतर्गत वाघ, बिबट, अस्वल आणि तृणभक्षक सफारीचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यादृष्टीने या सर्वच वन्यजीवांना सफारीत मुक्तपणे सोडण्यात येत आहेत. गोरेवाडा प्रशासन उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाला प्रारंभ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तेव्हा प्रकल्पाची तयारी झालेली नसल्याने उद्घाटन बारगळले होते. महाराष्ट्र वनविकास महामंडळातर्फे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय विकसित करण्याचे काम सुरू आहे. इंडियन सफारीत वाघ, बिबटे, अस्वल या प्राण्यांचे मोठे पिंजरे तयार झालेले आहेत. त्यात या प्राण्यांना सोडण्यात येत आहे. त्याचा मागोवासुद्धा घेण्यात येत आहे. इंडियन सफारीचे १२० हेक्टरमध्ये काम झालेले आहे.

एस्सेल वल्ड यांच्यासोबत हा प्रकल्प होणार होता. तसा करारही झाला होता. मात्र, आता हा करार रद्द होण्याच्या मार्गावर आहे. ५६४ हेक्‍टरमध्ये इंडियन, आफ्रिकन सफारी, बायो पार्क, नाइट सफारी, बर्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प २५२ कोटींचा असून यात आतापर्यंत १५० कोटींची गुंतवणूक झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे यासाठी वनमंत्री संजय राठोड यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निमंत्रण देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com