नागपुरात आयकर विभागाची धडक कारवाई, चार व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे

tapadiya house
tapadiya house

नागपूर : कर चुकवेगिरी केल्याच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने गुरुवारी शहरातील चार मोठ्या उद्योजकांच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या होत्या. कारवाईचा हा धडाका दुसऱ्या दिवशी देखील कायम होता. यादरम्यान काही ठिकाणी रोख रक्कम सापडल्याची प्राथमिक माहिती आहे.

धाड टाकलेल्या सर्व प्रतिष्ठानांनी प्राप्तिकर चोरी केल्याचा संशय आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया यांच्या निवाससह प्रतिष्ठानांवर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे,

या कारवाईतत शंभरपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे कळते.  यामुळे नागपूरच्या उद्योग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि तापडिया समूहाचे संचालक प्रवीण तापडिया यांच्या प्रतिष्ठानावर आणि घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी अचानक छापेमारी केली.

प्रवीण तापडिया हे प्रतिष्ठानाचे संचालक असून ते विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. तापडीया यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागाने छापे घातले असून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रसुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे.

पथकात शंभरपेक्षा जास्त अधिकारी
वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्तिकर विभागाने केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. प्राप्तिकर विभागाने आकस्मिक केलेल्या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी झालेल्या या कारवाईबाबत दिवसभर बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील कारवाई करण्यात आली.

नागपूरच्या उघोग जगातत खळबळ
प्रवीण तापडिया, पान मसाला उत्पादक अजक मामननी यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने धाडीत सापडलेल्या मालत्तेचा तपशील उघड केला नसला, तरी ही चोरी कोट्यवधींच्या घरातील असल्याचे कळते.

दुसऱ्या दिवशीच्या  कारवाईत लाखो रुपये रोख मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तीन ठिकाणची कारवाई संपली असून आणखी चार ठिकाणी कारवाई सुरू असल्याचे समजते. यावेळी कर चोरी केल्याची काही पुरावे संगणकात सापडल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com