Good News : आता सरकारी काम होणार लवकर; आवक-जावकसाठी सॉफ्टवेअर प्रणाली, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

Incoming and outgoing work will be done online in goverment office
Incoming and outgoing work will be done online in goverment office
Updated on

नागपूर : सरकारी काम आणि अनेक दिवस थांब, असे म्हटले जाते. एका विभागाची फाईल, अर्ज दुसऱ्या विभागात आठवडाभर पोहोचत नसल्याचे उदाहरण आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी आवज-जावकची नोंद तत्काळ होण्यासाठी हे काम ऑनलाइन करण्यात येणार आहे. यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार असून, याचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हा परिषद मुख्यालयातील आवक-जावक विभागामध्ये प्रशासकीय कामांसह जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात अर्ज असतात. प्राप्त अर्ज, तक्रारी आणि निवेदनांच्या नोंदी आवक-जावक रजिस्टरमध्ये घेण्यात येतात. अनेकदा यातील काही तक्रारी, अर्ज हे गाहाळही होतात. त्यामुळे अभ्यागताना अथवा अर्ज करत्याला त्याचे काम मार्गी लागण्यासाठी पुन्हा अर्ज, तक्रार करावी लागते.

परंतु, आता मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांच्या संकल्पनेतून जि. प.तील आवक-जावक विभागामध्ये प्राप्त होणारी टपालच्या नोंदी ही ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवक-जावक सॉफ्टवेअर प्रणाली सर्व कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आवश्यक करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आवक-जावक सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून जि. प.ला प्राप्त होणारी तक्रारी ऑनलाइन पद्धतीने संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. यातील किती तक्रारी निकाली काढण्यात आल्या आणि किती प्रलंबित आहे, यासंबंधीची सर्व माहिती आवक-जावक टपाल सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून सीईओंना तातडीने मिळेल.

या माध्यमातून प्रशासकीय कामांसह नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या कामावर नियंत्रण ठेवता येणार आहे. या अभिनव उपक्रमाद्वारे प्रलंबित प्रशासकीय कामांसह नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या कामाला गती मिळणार आहे. झिरो पेंडन्सीचा उद्देश या माध्यमातून सफल होणार असल्याचे सांगण्यात येते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com