esakal | जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण
sakal

बोलून बातमी शोधा

Love angle to the women arsonist in Nagpur Crime in nagpur

पोलिसांनी संबंधित चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. दुकानदार आणि लोकांची विचारपूस केली. त्यातून अशी घटनाच घडली नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलताच प्रियकर शादाबने त्याच्या फ्लॅटवर तिला पेट्रोल टाकून जाळल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला अटक केली.

जळीतकांडाचा उलगडा : मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा; हे आहे सत्य कराण

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : महिला जळीतकांडाचा उलगडा करण्यात सदर पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेने सांगितलेला घटनाक्रम पूर्णतः चुकीचा आहे. प्रेमसंबंधात आलेल्या वितुष्टातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. खुनाचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

शबाना जावेद (वय ४०, रा. महेंद्रनगर) असे जळून मरण पावलेल्या महिलेचे तर शादाब आफताब आलम (वय ३२, रा. आकार बिल्डर्स, बैरामजी टाऊन) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी तिला जळालेल्या अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिने मृत्यूपूर्वी बयानात वाद सोडविण्यासाठी गेली असता सदरमध्ये भरचौकात तरुणाने पेट्रोल ओतून जाळल्याचे सांगितले होते.

जाणून घ्या - संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

पोलिसांनी संबंधित चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. दुकानदार आणि लोकांची विचारपूस केली. त्यातून अशी घटनाच घडली नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलताच प्रियकर शादाबने त्याच्या फ्लॅटवर तिला पेट्रोल टाकून जाळल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला अटक केली.

फेसबूकवरील मैत्रीचा भीषण अंत

खासगी कंपनीत कामाला असणाऱ्या शबानाचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, तिला १२ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा आहे. पतीचे आठवडी बाजारात कपड्याचे दुकान आहे. आरोपी शादाब मूळचा बिहारचा असून शिक्षणासाठी आठ-दहा वर्षांपूर्वी नागपुरात आला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्थानिक नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. २०१७ मध्ये शबाना व शादाबची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर दोघांच्याही भेटीगाठीही सुरू झाल्या. राहणीमानावरून शबाना दोन मुलांची आई असल्याचा अंदाज बांधणे कठीण होते. तिनेही ही बाब लपवून ठेवली होती.

अधिक माहितीसाठी - गेल्या दशकात नागपुरात घडलेल्या 'त्या' ५ थरारक घटना ज्यांनी हादरलं अख्ख राज्य; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

वास्तविक घटनाक्रम

शबाना विवाहित असल्याचे गतवर्षी शादाबला समजले. यातून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तरीही अधूनमधून भेटीगाठी सुरूच होत्या. शादाब एक-एक पाऊल मागे घेण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या वागण्याही बदल झाला होता. शुक्रवारी तिने शादाबला फोन केला. व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटिंग सुरूच होते. दोघांमधील संबंधाचे भविष्य काय याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याच्या निर्धाराने ती शादाबच्या फ्लॅटवर गेली. दोघांमध्ये वाद झाला आणि शादाबने पेट्रोल ओतून तिला जाळले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करीत तो निघून गेला. 

असा लागला छडा

शबानाने दिलेल्या बयानावरून पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. चौकात घटनेबाबत कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला. व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग तपासले. त्यातून शादाबचे नाव पुढे आले. चौकशीत त्यानेच शबानाला जाळल्याची बाब पुढे आली. पोलिसांना त्याच्या फ्लॅटवरून जळालेले ब्लॅंकेट, चप्पल आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. घरच्यांची बदनामी टाळण्यासह शादाबला वाचविण्यासाठी तिने वेगळीच स्टोरी रंगविली असावी, असा कयास लावला जात आहे.