आनंदाची बातमी! कोरोनामुळे नागपूर जिल्ह्याची ही समस्या काही प्रमाणात सुटेल...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

जिल्ह्यातील एकूण पाणी पातळी सध्या 6.46 मीटरवर आली आहे. भूवैज्ञानिक विभागाकडून जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. जलस्त्रोतातील पाणी साठा व मान्सूनमध्ये पावसाच्यामाध्यमातून जमा होणाऱ्या पाणी साठ्यामुळे पुढील दीड-दोन वर्ष जिल्हावासियांच्या पिण्याचा पाण्याचा भेडसावण नसल्याची अपेक्ष व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर : जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये 1.58 मीटरने वाढ झाली आहे. मागील वर्षी झालेल्या चांगला पासून व यंदाच्या उन्हाळ्यात कोरोनामुळे पाण्याचा झालेला कमी वापरामुळे पातळी वाढल्याचे सांगण्यात येते. गेल्या पाच वर्षातील ही सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात येते. 

गतवर्षी जिल्ह्यात उशिरा मान्सून दाखल झाल्याने जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे जलस्त्रोतही आटले होते. त्यामुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्याची वेळही महापालिकेवर आली होती. यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे जलस्त्रोतांमधील पाणीसाठा वाढला.

हेही वाचा - काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

उन्हाळ्यात देशासह जिल्ह्यात कोरोनाचे सावट गळद झाल्यामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला. यामुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. सोबतच अनेक नागरिकांनी घरी कुलरचाही वापर टाळला. यामुळे पाण्याचा वापर कमी झाला. 

मे महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील पाणी पातळीची सरासरी 8.04 मीटर इतकी होती. यंदा विभागाकडून जिल्ह्यातील एकूण 111 विहिरींचे निरीक्षण केले. विभागाकडे पाणी पातळीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात पाणी पातळीमध्ये मागील पाच वर्षांच्या मे महिन्याच्या पाणी पातळीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जवळपास 1.58 मीटरने वाढ झाली आहे.

अधिक माहितीसाठी - शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...

जिल्ह्यातील एकूण पाणी पातळी सध्या 6.46 मीटरवर आली आहे. भूवैज्ञानिक विभागाकडून जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. जलस्त्रोतातील पाणी साठा व मान्सूनमध्ये पावसाच्यामाध्यमातून जमा होणाऱ्या पाणी साठ्यामुळे पुढील दीड-दोन वर्ष जिल्हावासियांच्या पिण्याचा पाण्याचा भेडसावण नसल्याची अपेक्ष व्यक्त करण्यात येत आहे. खरीप व रब्बी हंगामामध्येही शेतीकरता मुबलक पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात येते. 

तालुका 5 वर्षातील सरासरी यंदाची पाणी पातळी वाढ 
भिवापूर        8.54                       5.72 2.82 
हिंगणा          7.50        5.91              1.59 
कळमेश्वर      8.24         7.73                0.51
कामठी      9.82        8.07                 1.76
काटोल      7.40                    7 .18  0.22
कुही            7.63         4.86              2.77
मौदा              6.05        5. 40            0.65
नागपूर        8.72        7.64            1.08 
सावनेर        9.14        7.20            1.94 
उमरेड        6.25          4.55              1.70

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase the ground water level in the Nagpur district