हळदीला सोन्याची झळाळी; भावात अडीच ते तीन हजारांची प्रतिक्विंटलपर्यंत वाढ

Increase in price of turmeric from two and a half to three thousand per quintal
Increase in price of turmeric from two and a half to three thousand per quintal

नागपूर : जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी चिमूटभर हळदीचा वापर केला जातो. यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात अडीच ते तीन हजार रुपयांची प्रतिक्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. हळदीचे भाव पाच वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात ठोक बाजारात हळदीचा भाव आठ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या वर पोहोचला आहे.

देशात हळदीचे प्रमुख उत्पादक राज्य तेलंगणात हळदीचे क्षेत्र घटले आहे. तेलंगणात २०१९-२० मध्ये ०.५५ लाख हेक्टरमध्ये हळदीची लागवड झाली होती. यंदा त्यात घट झालेली आहे. तसेच राज्यातही लागवड कमी झाली. राज्यातही अवेळी आलेल्या पावसामुळे हळदीचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटलेले आहे. मागणी वाढल्याने हळदीचे भाव अचानक वाढले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशातही मोठ्या प्रमाणात हळदीची मागणी वाढलेली असल्याने निर्यातही वाढलेली आहे.

२०२०-२१ मध्ये ०.४५ लाख हेक्टरमध्ये हळदीची लागवड झाली असल्याची माहिती आहे. खराब हवामानामुळे उत्पादनावर बराच परिणाम झाला आहे. बाजार समितीमध्ये हळदीला आताच्या हंगामात चांगला भाव मिळताना दिसत आहे. मागील चार-पाच वर्षांत हळदीचे उत्पादन जास्त झाल्याने दर कमी होते.

यंदा उत्पादन कमी झाल्याने भाव वाढलेले आहेत. हळदीमध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे कोरोना काळात हळदीचे महत्त्व आणि वापर वाढला आहे. सध्या भारतात आणि परदेशात अँटिबायोटिक म्हणून हळदीचा वापर केला जात असल्याने हळदीच्या पावडरची मागणी वाढली आहे असे वाधवानी म्हणाले.

मागणीत तेजी

शेतकरी हळदीसाठी १० हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भावाची मागणी करत आहेत. लॉकडाऊन खुले झाल्यानंतर हळदीच्या मागणीत तेजी आली आहे. २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे मागणी घटली होती. यंदा लागवड कमी झाल्याने भाव वाढल्याचे व्यापारी प्रकाश वाधवानी यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा

हळदीच्या सौद्यात हळदीला ऐतिहासिक ३० हजार प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. आतापर्यंतचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. त्यामुळे शेतकरी, हळद व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनामुळे हळदीचे वाढलेले महत्त्व यामुळे देशांतर्गत आणि परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com