ब्रिटीशपूर्वकाळातही होते दर्जेदार शिक्षण पण.....काय म्हणात आर्वे,  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

मेकालेच्या पूर्वी या देशात शिक्षणाचा एक सुंदर वृक्ष बहरलेला होता पण ब्रिटिशांनी त्याची वाताहत केल्याचा आरोप महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये लंडन येथे केला असून, त्यास दौलत राम गुप्ता यांच्या यंग इंडिया नियतकालितामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संदर्भ होता. पुढे गांधीवादी विचारवंत धर्मपाल यांनी "द ब्यूटीफूल ट्री' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ब्रिटीशपूर्व काळातील भारतीय शिक्षणावर प्रकाश टाकत गांधीजींनी त्यावेळी केलेला आरोप सिद्ध केला, असे मत आर्वे यांनी नोंदविले आहे. 

नागपूर : भारतात ब्रिटीश आले नसते तर, देश शिक्षणापासून वंचित राहिला असता; सर्व थरातील व जातीतील प्रवर्गाच्या लोक केवळ इंग्रजांमुळेच शिक्षित झालेत, असा एक मतप्रवाह रुढ झाला आहे. त्यात काही अंशी तथ्य असले तरी ते संपूर्ण सत्य नाही. ब्रिटीशपूर्व काळात भारतात प्रभावी शिक्षण व्यवस्था होती असे मत प्रशांत आर्वे यांनी व्यक्‍त केले. 

सेव्ह मेरीट सेव्ह नेशनद्वारे आयोजित व्हेबिनारमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी सेव्ह मेरीट सेव्ह नेशनचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, महासचिव डॉ. अनुप मरार, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण बुटी उपस्थित होते. आर्वे म्हणाले, ब्रिटीशपूर्व काळात भारतात परिपूर्ण शिक्षण व्यवस्था होती. मेकालेच्या पूर्वी या देशात शिक्षणाचा एक सुंदर वृक्ष बहरलेला होता पण ब्रिटिशांनी त्याची वाताहत केल्याचा आरोप महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये लंडन येथे केला असून, त्यास दौलत राम गुप्ता यांच्या यंग इंडिया नियतकालितामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संदर्भ होता. पुढे गांधीवादी विचारवंत धर्मपाल यांनी "द ब्यूटीफूल ट्री' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ब्रिटीशपूर्व काळातील भारतीय शिक्षणावर प्रकाश टाकत गांधीजींनी त्यावेळी केलेला आरोप सिद्ध केला, असे मत आर्वे यांनी नोंदविले आहे. 

वाचा : आता तुकाराम मुंढेंना नगरसेवक करणार बदनाम, हा घेतला निर्णय...

हा देश केवळ मागास होता, शिक्षण नव्हते हा इंग्रजांनी निर्माण केलेला प्रपोगंडा आहे हे अशा अनेक संशोधनातून स्पष्ट होत असल्याचे आर्वे म्हणाले. एकंदर भारतीय शिक्षण व्यवस्थेची त्यांनी समीक्षा केली. तत्पूर्वी परिचय कोषाध्यक्ष सचिन पोशेट्टीवार यांनी दिला. डॉ. उत्पला मुळकवार आणि महेश कारवा यांनी समन्वयन केले. तर अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. व्हेबिनारच्या आयोजनासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य केले. 
.... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indin education system in pre-British times