esakal | निर्दोष सुटलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक करून गुन्हेगारांप्रमाणे काढले फोटो; नागपूर गुन्हे शाखेचा प्रताप

बोलून बातमी शोधा

The innocent man was arrested by the police and taken as a criminal}

अंबादेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्याच्या कुटुंबीयांना समजताच भावाने जरीपटका पोलिसात धाव घेतली. त्यावेळी अंबादे हा जबरी चोरीच्या प्रकरणात फरार असल्याचे त्याच्या भावाला सांगण्यात आले. जबरी चोरीच्या प्रकरणात न्यायालयाने २०१६ साली अंबादेची निर्दोष सुटका असे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले.

निर्दोष सुटलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक करून गुन्हेगारांप्रमाणे काढले फोटो; नागपूर गुन्हे शाखेचा प्रताप
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : एका गुन्ह्यातून निर्दोष सुटलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्याचे गुन्हेगारांप्रमाणे फोटो काढले आणि आरोपी म्हणून प्रसिद्धी केली. हा प्रताप ‘स्मार्ट’ आणि ‘डिजिटल’ नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. या प्रतापामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. राज अंबादे (५५, रा. जरीपटका) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २००० साली राज अंबादे आणि त्याच्या सहकाऱ्‍यांनी जरीपटका हद्दीत जबरी चोरी केली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने अंबादेची २०१६ साली निर्दोष मुक्तता केली. तरीही न्यायालयाने त्याला दीर्घ काळापासून फरार घोषित केले होते. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपींची यादी (डार्मड फाइल) पोलिसांकडे पाठविली होती. त्यात अंबादे यास फरार घोषित केले होते. आपली अटक टाळण्यासाठी अंबादे हा २१ वर्षांपासून वारंवार राहण्याचा पत्ता बदलवित होता.

जाणून घ्या - प्रेम एकीवर अन् साक्षगंध दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

पोलिसांकडे डार्मड फाइल आल्यानंतर अंबादेचा शोध सुरू केला. परंतु, तो मिळून आला नाही. पोलिसांनी सोमवारी सकाळी अंबादे यास शहर गुन्हे शाखेच्या शोध पथकाने ताब्यात घेतले आणि जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी गुन्हे शाखेचे एपीआय ईश्‍वर जगदाळे, एएसआय विलास चौबीतकर, हवालदार सतीश मेश्राम, सुजित देव्हारे आणि सुधीर सोंदरकर यांनी त्याचे आरोपींप्रमाणे फोटो काढले. अटक केल्याबाबत प्रसिद्धिपत्रक दिले. तसेच सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा केले.

अंबादेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्याच्या कुटुंबीयांना समजताच भावाने जरीपटका पोलिसात धाव घेतली. त्यावेळी अंबादे हा जबरी चोरीच्या प्रकरणात फरार असल्याचे त्याच्या भावाला सांगण्यात आले. जबरी चोरीच्या प्रकरणात न्यायालयाने २०१६ साली अंबादेची निर्दोष सुटका असे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाची प्रत पोलिसांना दाखविली. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली. खात्री केल्यानंतर पोलिसांनी अंबादेला सोडून दिले. मात्र, सहा ते सात तास त्याला गुन्हेगारासारखे पोलिस ठाण्यात बसून रहावे लागले.

अधिक वाचा - नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत

आमची चूक झाली

याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, न्यायालयाने दिलेल्या डार्मड फाईलनुसार अंबादेला फरार घोषित केले होते. न्यायालयाने ती फाइल आम्हाला दिल्यानंतर शोध पथकाने अंबादेचा शोध घेऊन ताब्यात घेतले. वास्तविक परिस्थिती समजल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यानेही आम्हाला निर्दोष सुटल्याचे सांगितले नाही. त्यामुळे आमची चूक झाली.