उपराजधानीत आज कोणते परिसर सील करण्यात आले...जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

शहरात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढत असून विविध परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे.

नागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढत असून विविध परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. आज बाजारपेठ असलेल्या इतवारीतील अनाज बाजार परिसरातही कोरोनाग्रस्त आढळून आला. त्यामुळे अनाज बाजारसह शांतीनगरातील स्वीपर कॉलनी तसेच नारा येथील आर्यनगर व निर्मल कॉलनी परिसर आयुक्तांनी सील केला. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधील नारा परिसरातील आर्यनगरात वैदेही अपार्टमेंट भागात कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे आर्यनगरातील दक्षिण पूर्वेस जितेंद्र सिंग ठाकूर यांचे घर, पश्‍चिमेस साधक अपार्टमेंट, उत्तर-पश्‍चिमेस गणेश प्रल्हाद राठोड यांचे घर, उत्तर-पूर्वेस जगजित सिंग यांचे घरापर्यंतचा परिसर सिल करण्यात आला. याच प्रभागातील नारा रोडवरील निर्मल कॉलनीतील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला.

निर्मल कॉलनीतील दक्षिण पूर्वेस किशोर चहांदे यांचे घर, दक्षिण-पश्‍चिमेस नरेंद्र सहदेव डोंगरे यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस एस. डी. गणोरिया यांचे घर, उत्तर पूर्वेस रॉबर्ट मायकेल मरियण यांचे घरापर्यंत निर्बंध लावण्यात आले. सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग 21 मध्ये इतवारी अनाज बाजार परिसरही कोरोनाबाधितामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

अनाज बाजारातील उत्तर-पूर्वेस गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी, दक्षिण पूर्वेस वंदे मातरम्‌ प्रिटिंग प्रेस, दक्षिण-पश्‍चिमेस चांदुमल भगवानदास किराणा, पश्‍चिमेस शिवनारायण किसन अगरबत्ती, उत्तर-पश्‍चिमेस भोजराज गोपालदास यांच्या दुकानापर्यंत निर्बंध लावण्यात आले.

याच प्रभागातील शांतीनगर स्वीपर कॉलनीतील परिसरही सिल करण्यात आला. स्वीपर कॉलनीच्या उत्तर पूर्वेस अस्मिता वानखेडे यांचे घर, दक्षिण पूर्वेस अशोक विराट यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस दिनेश असरेट यांचे घर, पश्‍चिमेस सूरज समुंद्रे यांचे घर, पश्‍चिमेस सुंदरलाल समुंद्रे यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस धर्मदास समुंद्रे यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: itwari, shantinagar area seal