जमाल सिद्धिकी म्हणाले, काँग्रेसने फक्त राजकारणच केले; लव्ह जिहादचा संबंध धर्माशी नाही

Jamal Siddiqui said that love jihad has nothing to do with religion
Jamal Siddiqui said that love jihad has nothing to do with religion

नागपूर : लव्ह जिहाद संबंधी प्रस्तावित कायदा कुठल्याही धर्माविरुद्ध नाही. सामाजिक सुरक्षेसाठी तो तयार केला जात आहे. त्यामुळे कोणालाच घाबरण्याचे कारण नाही, असे भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी सांगितले.

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा व कर्नाटक सरकार हा कायदा तयार करण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने लगेच विधान सभेत विधेयक मांडण्याची घोषणासुद्धा केली आहे. या कायद्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अनेकजण त्याचा धर्माशी संबंध जोडत आहे. त्या माध्यमातून राजकारण करून गैरसमजही पसरविले जात आहे. या बाबत पत्रकारांसोबत बातचीत करताना जमाल सिद्धिकी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.

जिहाद शब्दाचा अर्थच वेगळा आहे. प्रेमाच्या विरुद्धार्थी जिहादचा अर्थ आहे. त्यामुळे मुळात लव्ह जिहाद हा शब्दच चुकीचा आहे. जिहाद शब्द वापरल्या जात असल्याने काहीजण मुस्लिम समाजात गैरसमज पसरवीत आहे. त्याला धर्माची जोड देत आहेत.

अल्पसंख्याक समुदायामध्ये संभ्रम निर्माण करून काँग्रेस आजवर राजकारण करीत आहे. अल्पसंख्याकांचा शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक विकासासाठी कुठलेच ठोस काम केले नाही. आपली व्होट बँक म्हणून त्यांचा वापर केला, असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरचे ३७० कलम हटवल्यानंतर त्या राज्यांमध्ये वेगाने विकास होत आहे. स्थानिक रहिवासी आनंदित आहेत. त्यांना कुठलाच फरक पडलेला नाही. फक्त येथील दोन राजकीय पक्षांचे राजकारण संपुष्टात येऊ लागल्याने त्यांनीच भ्रम पसरवणे सुरू केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांच्या रोजगाराची मागणी सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर आपण ही मागणी ठेवली आहे. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यातील नागरिकांना विकास हवा आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये बदलाचे वारे वाहत असल्याचे जमाल सिद्दिकी यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com